Ratan Tata | लग्नपत्रिका छापण्यापूर्वीच मोडला होता रतन टाटा यांचा साखरपुडा, जाणून घ्या पूर्ण किस्सा

नवी दिल्ली : Ratan Tata | देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (industrialist Ratan Tata) यांनी अमेरिकेतून आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेजच्या दिवसात त्यांना तेथील वातावरण आणि स्वातंत्र्य मिळाले होते ज्यामुळे ते विशेष प्रभावित झाले होते. यामुळे त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, त्यांना अमेरिकेचे (America) थंड वातावरण सहन होत नव्हते. याच कारणामुळे त्यांनी न्यूयॉर्कच्या इथाका शहराच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता.

रतन टाटा यांना भारतात परत यायचे नव्हते. यामुळे शिक्षण पूर्ण करताच ते न्यूयॉर्कवरून अमेरिकेचे दुसरे शहर लॉस एंजिल्समध्ये शिफ्ट झाले होते. परंतु त्यांनी जसा विचार केला होता तसे झाले नाही. अखेर अशी स्थिती तयार झाली की त्यांना परतावे लागले आणि नंतर येथेच राहिले.

आजीची तब्येत बिघडल्याने परतावे लागले :

शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा अमेरिकेतच अर्किटेक्टची नोकरी शोधत होते. त्यांना अमेरिकेत एक आर्किटेक्ट म्हणून नाव कमवायचे होते. या दरम्यान त्यांच्या आजीची तब्येत अचानक खराब झाली. अशावेळी रतन टाटा स्वताला थांबवू शकले नाहीत आणि ते भारतात परत आले.

पीटर केसी (Peter Casey) आपले पुस्तक ‘द स्टोरी ऑफ टाटा : 1868 टू 2021 (The Story of Tata: 1868 to 2021) मध्ये लिहितात की त्यावेळी रतन टाटा यांची एक अमेरिकन गर्लफ्रेंड (American girlfriend) सुद्धा होती जिला त्यांच्यासोबत भारतात यायचे होते, परंतु तसे होऊ शकले नव्हते. नंतर त्यांच्या आजीची तब्येत सतत बिघडलेली राहू लागली आणि टाटा यांनी येथेच राहण्याचा निर्णय घेतला.

Gold Price Update | 8666 रुपये प्रति तोळा ‘स्वस्त’ मिळतंय सोनं, येथे जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर

तुटला होता साखरपुडा :

एनडीटीव्हीने पीटर केसी (Peter Casey) यांच्या पुस्तकातील काही अंश प्रसिद्ध केला आहे. आपल्या
पुस्तकात केसी यांनी रतन टाटा यांच्या विवाहाशी संबंधीत एक किस्सासुद्धा नमूद केला आहे. पीटर केसी
यांच्यानुसार, रतन टाटा यांच्या जीवनात चार गर्लफ्रेंड होत्या (Ratan Tata had four girlfriends in his life) आणि ते चौघींच्या बाबतीत खुप गंभीर होते. एकदा तर त्यांच्या विवाहाची पूर्ण तयारी सुद्धा झाली
होती, परंतु लग्नपत्रिका छापण्यापूर्वीच साखरपूडा तुटला. यानंतर त्यांनी कधीही लग्न केले नाही.

कारण रतन टाटा आपल्या आजीच्या अतिशय जवळ होते, अशावेळी त्यांनी अमेरिका सोडून भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आणि टाटा संस्थेचे काम सुद्धा सांभाळू लागले. हळुहळु येथे स्थिर झाले आणि नंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

भारत-चीन युद्धामुळे मिळाली नाही परवानगी :

रतन टाटा यांनी स्वता एका मुलाखतीमध्ये आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
त्यांनी सांगितले होते की, अमेरिकेत राहात असताना एका मुलीसोबत खुप प्रेम जडले होते आणि तिच्याशी
कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचे होते.

टाटा यांना वाटले की ती मुलगी त्यांच्यासोबत भारतात येईल आणि दोघे विवाह करतील. परंतु असे झाले नाही.
कारण, 1962 मध्ये भारत-चीन युद्ध सुरू झाले आणि त्यांच्या आई-वडिलांनी या विवाहास परवानगी
नाकारली. हळुहळु दोघांचे नाते एका वळणावर येऊन संपले.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीवर सर्व पक्षीय सदस्यांचा बहिष्कार ! जाणून घ्या प्रकरण

ACB Police Inspector Transfer | अ‍ॅन्टी करप्शन विभागातील 34 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या अन् नियुक्त्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ratan Tata | business tycoon ratan tata wife children family biography engagement ended up just before card printing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update