आपल्या सर्वांसाठी हे वर्ष आव्हानात्मक, रतन टाटांचे नेटकर्यांना आवाहन !
पोलिसनामा ऑनलाईन – टाटा ग्रुप्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ऑनलाइन माध्यमांतून परसरविला जाणारा द्वेष आणि सायबर बुलिंग (दादागिरीला) थांबवण्याचे आवाहन केले आहे. हे वर्ष आव्हानात्मक असून अशावेळी एकमेकांना पाठिंबा आणि आदार दिला पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. त् यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.
ऑनलाइन माध्यमांवर लोक एकमेकांना लागेल असे आणि एकमेकांना घालून पाडून बोलतात. त्यामुळे टाटा यांनी त्यांच्या हॅशटॅग, ट्रेण्ड्स आणि पोस्टवर आक्षेप घेतला आहे. या ना त्या माध्यमातून हे वर्ष सर्वांसाठी आव्हानात्मक आहे. ऑनलाइन माध्यमांवरील लोकं एकमेकांना त्रास देत असल्याचे मला पहायला मिळत आहे. एकमेकांना खाली खेचणे, टोकाची भूमिका घेणे आणि पटकन एखाद्याबद्दल मत बनवणे असे प्रकार होत आहेत.
या वर्षी आपण पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने राहत एकमेकांना मदत करण्याचे आहे. एकमेकांना खाली खेचण्याचा हा वेळ नाही, असेही टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एकमेकांबद्दल संवेदनशील राहण्याबरोबरच आज आपल्याला जे चित्र दिसत आहे त्यापेक्षा अधिक दयाळू, एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे . मी खूप कमी वेळ ऑनलाइन असतो. निमित्त काहीही असले तरी एकमेकांवर दादागिरी करण्याऐवजी आणि द्वेष पसरवण्याऐवजी हे माध्यम सहानुभूती देणारे पाठिंबा देणारे ठरो अशी माझी इच्छा आहे, असेही टाटा यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.