रतन टाटा आता ‘लेन्सकार्ट’ची साथ सोडणार, 5 वर्षात कमावला एवढा फायदा

पोलिसनामा ऑनलाईन : २०१६ साली त्यांनी स्टार्ट अप लेन्सकार्टमध्ये १० लाखांची गुंतवणूक केली होती. आता आपली गुंतवणूक मागे घेताना त्यांना तब्बल ४.६ टक्के नफा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी आपली लेन्सकार्टमधील गुंतवणूक मागे घेतली आहे. रतन टाटा यांनी अनेक स्टार्ट अपमध्ये आपली गुंतवणूक केली आहे. तसेच त्यांनी अनेक मोठ्या उद्योगातही आपली गुंतवणूक केली आहे. त्यांनी लेन्सकार्टमध्ये केलेली १० लाखांच्या गुंतवणुकीचा परतावा त्यांना तब्बल ४.६ पटीने मिळाला आहे.

रतन टाटा यांनी २० पेक्षा जास्त स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये ओला, ओला इलेक्ट्रिक, Cure.fit, FirstCry,अर्बन कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे. हुरुन रीच लिस्टमध्ये रतन टाटा यांची संपत्ती ही ६००० कोटी रुपयांची आहे. लेन्सकार्ट एक आय वियर कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २००८ साली पीयूष बन्सल, सुमित कापही आणि अमित चौधरी यांनी केली होती. या कंपनीचे आता देशभरात ५३५ पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. डिसेंबर २००८ साली या कंपनीची व्हॅल्यूएशन ही एक अरब इतकी होती. जपानच्या सॉफ्टबॅंकेने यामध्ये २३.१ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या कंपनीत केदारा कॅपिटल, प्रेमजी इन्व्हेस्ट सारख्या मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.