
Ratan Tata | रतन टाटांना वाढदिवसाचा केक भरवणारा ‘तो’ तरुण कोण? त्याचा पुण्याशी काय संबंध? जाणून घ्या (व्हिडिओ)
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे प्रसिद्ध उद्योगपती (Industrialist) रतन टाटा (Ratan Tata) यांचा 28 डिसेंबर रोजी 84 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. रतन टाटा यांनी आपला वाढदिवस (Birthday) अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रतन टाटा (Ratan Tata) कप केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारताना दिसत आहे. मात्र, त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडित हा तरुण रतन टाटांना (Ratan Tata) वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, त्यांच्या खांद्यावरुन प्रेमाने हात फिरवतो आणि कप केकचा एक तुकडा त्यांना भरवतो. रतन टाटांचा वाढदिवस साजरा करणारा हा तरुण नेमका आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रतन टाटांना भेटण्याची इच्छा प्रत्येकाला असते. मात्र व्हिडिओत दिसणाऱ्या या तरुणाला केवळ त्यांना भेटण्याचीच नाही तर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. हा तरुण पुण्याचा असून त्याचे नाव शंतनू नायडू (Shantanu Naidu) आहे. म्हणताता ना मैत्रीला वयाची मर्यादा नसते. तसेच शंतनू आणि रतन टाटा यांच्यामध्ये आहे. शंतनू आणि रतन टाटा यांच्या असलेल्या मैत्रीची गोष्ट अनेकांना कुतुहलाचा विषय आहे.
A charming scene with the unassuming #RatanTata on his 84th birthday pic.twitter.com/wkmm7jhCyZ
— Harsh Goenka (@hvgoenka) December 29, 2021
अशी झाली दोघांमध्ये मैत्री
शंतनू हा सध्या रतन टाटा यांच्या सोबत टाटा ट्रस्टमध्ये (Tata Trust) काम करतो. कॉलेजमध्ये शिकत असताना त्याने रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहनांची धडक बसून होणारे कुत्र्यांचे मृत्यू रोखण्यासाठी रंगीत, चमकदार पट्टे बनवले होते. त्याने हे पट्टे कुत्र्यांच्या गळ्यात घातले. त्यामुळे रात्रीच्या वेळी पथदिवे नसले तरी वाहनचालकाला लांबूनच ते दिसत होते. परिणामी कुत्र्यांचे अपघातात (Accident) मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाली आणि अनेक कुत्र्यांचे प्राण वाचले. त्याच्या या कल्पनेने रतन टाटा आणि शंतनू या दोन श्वान प्रेमींची एकत्र आणलं. शंतनूने सुरु केलेल्या ‘मोटोबॉब्ज’ Motobobs या उद्योगात टाटांनी गुंतवणूक केली आहे.
शंतूनचे वडील ‘टाटा अॅडव्हान्सेस सिस्टीम्स’मध्ये काम करतात. तर आई शिक्षिका आहे. शंतनू याने न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठातून (Cornell University New York) एमबीएचे (MBA) शिक्षण घेतले आहे. या विद्यापीठात पदवीप्रदान समारंभाला उपस्थित राहण्याचे आश्वासन रतन टाटा यांनी शंतनूला दिले होतं आणि त्यांनी ते आश्वासन पाळले देखील.
Web Title : MLA Nitesh Rane | sindhudurg district central bank election cooperative department denied voting rights to nitesh rane
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या
कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या
तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय
Maharashtra Police | पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ