Ratan Tata Love Story | बिझनेसमध्ये यशस्वी ठरलेल्या रतन टाटा यांनी का केला नाही विवाह, कसे तुटले होते प्रेयसीसोबतचे नाते? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एयर इंडिया (Air India) ची बोली टाटा सन्स (Tata Sons) ने जिंकली आहे. कंपनीने या सरकारी एयरलाईन्ससाठी सर्वात जास्त 18,000 कोटी रुपयांची बोली लावली होती. यासोबतच एयर इंडिया सुमारे 68 वर्षानंतर पुन्हा टाटा समुहाकडे गेली आहे. यामुळे समुहाचे मानद चेयरमन रतन टाटा (Ratan Tata Love Story) यांनी आपला आनंद व्यक्त करत ट्विट करून म्हटले ‘वेलकम बॅक होम’! देशातील यशस्वी आणि दानशूर उद्योगपती अशी रतन टाटांची प्रतिमा आहे. अविवाहित असलेल्या रतन टाटांचे बालपण, तरूणपण आणि अर्धवट राहिलेली प्रेमकथा (Ratan Tata Love Story) आज आपण जाणून घेणार आहोत.

लॉस एंजेलिसमध्ये झाले होते प्रेम

टाटा समूहाचे मानद चेयरमन रतन टाटा यांनी अनेकदा आपले वैयक्तिक जीवन आणि प्रेमप्रकरणाबाबत (Ratan Tata Love Story) चर्चा केली आहे.
टाटा सन्सचे 82 वर्षीय चेयरमन रतन टाटा यांचे दोन वर्षापर्यंत एका कंपनीत काम करत असताना लॉस एंजलिसमध्ये एका मुलीवर प्रेम जडले होते, परंतु 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे ते विवाह करू शकले नव्हते. त्यांचे बालपण खुप सुखद होते, परंतु आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने त्यांना आणि त्यांच्या भावाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

 

आजीसोबत होते जवळचे नाते

रतन टाटा यांनी आपल्या लव्ह स्टोरीबाबत सांगितले होते की, ‘ते एल.ए. (लॉस एंजलिस) मध्ये झाले होते.
माझे प्रेम (Ratan Tata Love Story) जडले आणि विवाहसुद्धा होणार होता, परंतु मी त्याचवेळी काही काळासाठी भारतात परण्याचा निर्णय घेतला होता.
कारण मी माझ्या आजीपासून जवळपास 7 वर्षांपासून दूर होतो.

यासाठी मी तिला भेटण्याकरता परत आलो आणि विचार केला की, जिच्यावर मी प्रेम करतो तिने माझ्यासोबत भारतात यावे.
परंतु 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे त्यांचे आई-वडिल या विवाहासाठी राजी झाले नाहीत आणि नाते तुटले.

यामुळे सहन कराव्या लागल्या अडचणी

त्यांनी आपल्या बालपणाबाबत सांगितले की, कशाप्रकारे गोष्टी त्यांच्यासाठी नेहमी सोप्या नव्हत्या. ते म्हणाले की, माझे बालपण सुखी होते.
परंतु जस-जसे मी आणि माझा भाऊ मोठे होत गेलो, आम्हाला आमच्या आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे रॅगिंग आणि वैयक्तिक समस्यांचा सामना करावा लागला.
जे त्याकाळात इतके सामान्य नव्हते, जेवढे आज आहे.
रतन टाटा यांनी सांगितले की, त्यांचे वडील नवल आणि आई सोनी टाटा यांचा घटस्फोट त्यावेळी झाला जेव्हा ते अवघे 10 वर्षांचे होते.

आजीने खुप काही शिकवले

त्यांनी सांगितले की, जेव्हा माझ्या आईने दुसरा विवाह केला, त्यानंतर ताबडतोब, शाळेतील मुले आमच्याबाबत काहीही बोलत असत.
परंतु आमच्या आजीने आम्हाला कोणत्याही स्थितीत सन्मान राखण्यास शिकवले.

त्यांनी म्हटले की, मला आज सुद्धा आठवते की कशाप्रकारे दुसर्‍या महायुद्धानंतर ती मला आणि माझ्या भावाला उन्हाळ्याच्या सुटीसाठी लंडनला घेऊन गेली होती.
प्रत्यक्षात तिथेच तिने आमच्यावर संस्कार केले. ती आम्हाला सांगत असे की, ‘असे बोलू नका‘ किंवा ‘याबाबत शांत रहा‘ आणि अशाप्रकारे आमच्या डोक्यात तिने रूजवले की, प्रतिष्ठा सर्वात वर आहे.

 

वडिलांशी होते वैचारिक मतभेद

त्यांनी आपल्या आणि वडिलांच्या वैचारिक मतभेदांबाबत म्हटले की, मला व्हॉयलीन शिकायचे होते आणि माझे वडिला पियानो शिकण्यासाठी सांगत होते.
मला शिक्षणासाठी अमेरिकेच्या कॉलेजमध्ये जायचे होते, तर वडीलांची इच्छा होती की मी लंडनला जावे.

मला आर्किटेक्ट व्हायचे होते आणि ते म्हणत होते इंजिनियर हो. मात्र नंतर रतन टाटा शिक्षणासाठी अमेरिकेच्या कॉर्नेल युनिव्हर्सिटीत गेले आणि त्याचे पूर्ण श्रेय त्यांनी आपल्या आजीला दिले.
आर्किटेक्टमधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांचे वडील नाराज झाले होते.
नंतर रतन टाटा लॉस एंजलिसमध्ये नोकरी करू लागले जिथे त्यांनी दोन वर्षापर्यंत काम केले.

शिक्षणादरम्यान झाले प्रेम

त्या दिवसांबाबत टाटांनी सांगितले की, तो खुप चांगला काळ होता, वातावरण खुप सुंदर होते.
माझी स्वताची गाडी होती आणि माझे माझ्या नोकरीवर प्रेम होते.
लॉस एंजलिसमध्ये रतन टाटा यांचे एका मुलीवर प्रेम होते आणि ते तिच्याशी लग्न करणार होते.
मात्र, त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला कारण त्यांच्या आजीची प्रकृती ठीक नव्हती.

रतन टाटा यांना वाटत होते की, ज्या महिलेवर ते प्रेम करत होते ती सुद्धा त्यांच्यासोबत भारतात येईल.
रतन टाटा यांच्यानुसार, 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे त्याचे आई-वडील त्या मुलीने भारतात येण्याच्या बाजूने नव्हते आणि अशाप्रकारे त्यांचे प्रेम तुटले.

 

Web Title : Ratan Tata Love Story | air india return to tata group chairman know about emeritus chairman ratan tata love story marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Solapur Crime | धक्कादायक ! पोलिस ठाण्याच्या परिसरातच 16 वर्षीय मुलावर खूनी हल्ला

Pune Crime | विवाहितेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी ! 2 वर्षापुर्वीच्या मर्डरचा पर्दाफाश, जाणून घ्या पुण्याच्या मुळशी तालुक्यातील प्रकरण

Aurangabad Crime | खळबळजनक ! प्राध्यपकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, विचित्र खूनाच्या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला