सफाई कामगारांसाठी रतन टाटांनी सुरू केला नवा उपक्रम, शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले आहेत. आत्तापर्यंत त्यांचे १.२ मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. ८२ वर्षीय टाटा यांनी मंगळवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. सुमारे 3 मिनिटांचा हा व्हिडिओ टाटा ट्रस्टच्या ‘मिशन गरिमा’ उपक्रमाचा भाग आहे.

रतन टाटा यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मिशन गरिमा’ आमच्या बहादूर सफाई कामगारांसाठी’. दरम्यान, ही जाहिरात शेअर झाल्यानंतर ट्विटरवर #TwoBinsLifeWins हॅशटॅग व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये एक शाळेचा विद्यार्थी दाखविला आहे, जो स्पर्धेदरम्यान त्याच्या वर्गमित्रांना आणि त्यांच्या पालकांना संबोधित करतो. यावेळी बोलताना म्हणतो कि, ‘माझे बाबा देश चालवतात.’ मुलाचे हे वाक्य ऐकून उपस्थित लोकांना काहीच समजत नाही. त्यानंतर पुढे बोलताना तो मुलगा म्हणतो कि, ‘तो नेता नाही पण तो देश चालवतो, तो डॉक्टर नाही तरी तो रोग पळवितो. तो पोलिसातही नाही मात्र देशातील घाण मिटवते. तो सैन्यातही नाही, परंतु घाणेरड्या शत्रूंचा खात्मा करतो.’

View this post on Instagram

In Mumbai, a city of 23 million, only 50,000 individuals are employed as sanitation workers. They are working in difficult conditions every single day to tackle the enormous amount of waste that Mumbai generates. As a @tata_trusts initiative, Mission Garima is working to provide safe, hygienic and humane working conditions for sanitation workers who are severely affected doing the unimaginable for the city so that we may find it clean! #TwoBinsLifeWins is a campaign urging citizens to segregate their biodegradable and non-biodegradable waste to help reduce the burden on these hardworking men and women. The links below will help you dispose of your waste responsibly and support our initiative. After all, this country is run by each one of us. https://www.tatatrusts.org/ #TwoBinsLifeWins

A post shared by Ratan Tata (@ratantata) on

मुलगा पुढे म्हणतो, ‘जर माझा बाबा कामावर गेला नाही तर भारतातील प्रत्येक घर थांबेल. तेथे जेवण बनणार नाही, अंघोळ होणार नाही, रस्त्यावर चेंगराचेंगरी होईल, मूलं शाळेत पोचणार नाही ना डॉक्टर रुग्णालयात आणि नाही नेता मंत्रालय. देशातील कोणताही बाबा असे काम करायचा नाही जो माझा बाबा करतो. माझ्या बाबांना देश हवा आहे.’ त्यानंतर जाहिरातीमध्ये सफाई कामगार नाल्यात असल्याचे दिसून येते. त्यानंतर तो विद्यार्थी म्हणतो, ‘कारण देश आपला ओला व सुका कचरा वेगळा करीत नाही, म्हणून माझा बाबा कचरा, गटार आणि आजारांच्या आत जातो. आणि खूप आजारी होऊन बाहेर येतो. कधीकधी असे वाटते की, तो आजाराने खचून जाईल, तो घरी परत येणार नाही, माझ्या बाबाला वाचावा, केवळ त्याच्यावरच देश चालवू नका, कारण देशातील प्रत्येक माणूस देश चालवितो. ‘

दरम्यान, हा हृदयस्पर्शी व्हिडिओ आतापर्यंत 5,57,944 वेळा पहिला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रतन टाटांनी लिहिले की, ’23 दशलक्ष लोकांच्या मुंबई शहरात केवळ 50,000 लोकांना स्वच्छता कामगार म्हणून काम दिले जाते आणि ते दररोज कठीण परिस्थितीत काम करतात. शहरात अकल्पनीय कामे करणार्‍या स्वच्छता कामगारांसाठी ‘मिशन गरिमा’ कार्यरत आहे. जेणेकरून आपण स्वच्छतेत जगू शकाल. ‘

रतन टाटा यांनी केले आवाहन :
रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमधील वाचकांना स्वच्छता कामगारांवर होणारा भार कमी करण्यासाठी बायोडिग्रेडेबल आणि नॉन-बायोडेग्रेडेबल कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले आहे. शेवटी ते लिहितात, ‘शेवटी, हा देश आपल्यातील प्रत्येक व्यक्तीकडून चालविला जातो.’

You might also like