Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | रतन टाटांच्या ‘या’ 2 कंपन्यांनी राकेश झुनझुनवाला यांना करून दिली सर्वात जास्त कमाई, जाणून घ्या यावर्षी किती दिला रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | शेयर बाजारात (stock market) बिगबुल नावाने प्रसिद्ध राकेश झुनझुनवाला (Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala) यांना यावर्षी मोठी कमाई झाली आहे. ज्या शेयरमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती त्या शेयरमध्ये जबरदस्त वाढ पहायला मिळाली आहे. विशेषता टाटा ग्रुपच्या कंपन्यांनी (Tata Group companies) झुनझुनवाला यांचा बँक बॅलन्स खुप वाढवला आहे.

 

टाटा मोटर्स (Tata Motors) आणि टायटन (Titan) च्या शेयरमध्ये मोठी भागीदारी असल्याने बिगबुलला मोठी कमाई झाली आहे. यावर्षी टाटा मोटर्सने 75 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. तर टायटनने सुद्धा 60 टक्केचा रिटर्न दिला आहे. अखेर राकेश झुनझुनवाला यांच्याकडे या दोन कंपन्यांची किती भागीदारी आहे जाणून घेवूयात…

 

टाटा मोटर्सने करून दिली 76 टक्के कमाई
Tata समुहाच्या कंपनीचे, राकेश झुनझुनवाला (Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala) यांच्याकडे 3,67,50,000 शेयर किंवा 1.11 टक्के भागीदारी आहे. 2021 मध्ये, टाटा मोटर्सच्या शेयरची किंमत 290 वरून वाढून 510 रुपये प्रति शेयर स्तरावर पोहचली.

 

याचा अर्थ हा आहे की, या शेयरने गुंतवणुकदारांना या वर्षी 76 टक्के रिटर्न दिला आहे. राकेश झुनझुनवाला (Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala) यांनी दुसर्‍या तिमाहीत 10 लाख शेयरची कपात केली आहे.

टायटन कंपनीने सुद्धा करून दिली कमाई
टाटा समूहाच्या या कंपनीत राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक आहे.
एप्रिल ते जून 2021 तिमाहीसाठी टायटन कंपनीच्या शेयरधारक पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 3,30,10,395 शेयर आहेत
तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 96,40,575 शेयर आहेत.

 

यावर्षी टायटन कंपनीच्या शेयरची किंमत जवळपास 1560 रुपयांवरून वाढून 2485 रुपये प्रति शेयर झाली आहे.
ज्यामुळे 2021 मध्ये आपल्या शेयरधारकांना जवळपास 60 टक्केचा रिटर्न दिला आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | ratan tata companies made highest earning for rakesh jhunjhunwala know how much return this year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत ‘बालगंधर्व’ रंगमंदिरात वाजली तिसरी घंटा; कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती… (व्हिडीओ)

Ajit Pawar | पुणेकरांसाठी खुशखबर ! अजित पवारांकडून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी

Corona | चिंताजनक ! ब्रिटन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिएंट तर चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव