Ratan Tata | यशस्वी होण्यासाठी लक्षात ठेवा रतन टाटा यांच्या ‘या’ 6 गोष्टी ! मोठ्या कमाईसोबतच तुम्ही व्हाल सर्वांचे आवडते; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Ratan Tata | प्रत्येकाला भरपूर पैसा कमवायचा आहे, यशस्वी व्हायचे आहे, परंतु ते मिळवण्यासाठी कोणत्या मार्गावरून जावे हे फार थोड्या लोकांना माहित असते. जर तुम्ही तुमचा उद्योग सुरू करत आहात किंवा अगोदरपासून बिझनेस आहे, परंतु प्रगतीची वाट पहात आहात तर तुमच्यासाठी उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata ) यांच्या गोष्टी उपयोगी ठरू शकतात. कोणतीही कंपनी स्टार्ट करण्यासाठी त्यांच्या कोणत्या प्रमुख गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेवूयात…

1. इनोव्हेशनवर जोर
रतत टाटा यांचे म्हणणे आहे की त्या स्टार्टअप्सचे भविष्य शानदार आहे, ज्यांनी नवीन प्रयोग केले आहेत. यासाठी इनोव्हेशन करत राहिले पाहिजे. टाटा स्टार्टअपसाठी इनोव्हेशनवर जास्त जोर देत आहेत.

2. व्हॅल्यूवर फोकस
टाटा ग्रुपची व्हॅल्यू खुप हाय आहे. अशावेळी रतन टाटा अपेक्षा करतात की, स्टार्टअपने सुद्धा व्हॅल्यू फॅक्टरला महत्व द्यावे. रातोरात फरार सारख्या घटनांच्या ते सक्त विरोधात आहेत.

3. प्रमोटर्सचा अ‍ॅटिट्यूट असावा पॉझिटिव्ह
रतन टाटा यांच्यानुसार, स्टार्टअपच्या प्रमोटर्सचा अ‍ॅटिट्यूट कसा आहे, ते कोणत्या आयडियासोबत आले आहेत आणि त्याच्या सोल्यूशन्सबाबत त्यांच्या विचाराच्या आधारावर काम करतात हे महत्वाचे आहे. टाटा यांच्यानुसार, ते नवीन कंपनीत गुंतवणुक करणे पसंत करतात. विशेषकरून नवीन आयडियाजच्या स्टार्टअपमध्ये.

4. कोणताही राईट टाइम नाही
ऑक्टोबर 2019 मध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये रतन टाटा यांनी म्हटले होते की, स्टार्टअपसाठी ग्लोबल होण्यासाठी राईट टाइमसारखे काहीही नसते.
ही जबाबदारी आणि समज फाऊंडरची असते की केव्हा त्यांना जागतिक विस्तार करायचा आहे.
सोबतच रतन टाटा यांनी म्हटले होते की, मी सुद्धा पाहतो की, प्रमोटर्स किती मॅच्युअर आहेत आणि आपल्या नवीन कंपनीबाबत ते किती गंभीर आहेत.

5. कामाला द्यावे प्राधान्य
असे भारतातील अनेक औद्योगिक कुटुंबांसोबत होते की, ते उद्योगासोबत राजकारणात सुद्धा रस घेऊ लागतात. परंतु टाटा ग्रुप आणि विशेषता रतन टाटा या गोष्टींपासून दूर राहिले आहेत.
त्यांनी नेहमी आपल्या जीवनात कामालाच सर्वकाही समजले.
सर्वप्रथम कामाला प्राधान्य दिले आहे.

6. दुसर्‍यांना द्या सन्मान
रतन टाटा यांना खासगीत ओळखणारे सांगतात की, ते नेहमी शांत आणि सौम्य राहतात.
ते आपल्या कंपनीच्या छोट्यातील छोट्या कर्मचार्‍यांना सुद्धा मोठ्या प्रेमाने भेटतात.

 

हे देखील वाचा

आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45% 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Title : ratan tata successful business tips you can achieve more money and success check details varpat