Ratan Tata TCS RIL | रतन टाटा यांच्या TCS आणि रिलायन्सचे झाले 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ratan Tata TCS RIL | या आठवड्यात शेयर बाजारात (stock market) खुप घसरण दिसून येत आहे. ज्यामुळे देशातील दोन सर्वात मोठ्या कंपन्यांना (two largest companies in the country) 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ज्यामध्ये रतन टाटा यांची टीसीएस (Ratan Tata’s TCS) आणि मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स (Mukesh Ambani’s Reliance) चा समावेश आहे. दोन्ही कंपन्यांच्या शेयरमध्ये मोठी घसरण दिसून (Ratan Tata TCS RIL) आली आहे.

तर दुसरीकडे बीएसईच्या ओव्हरऑल मार्केट बाबत बोलायचे तर गुंतवणुकदारांना 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागले आहे.

जाणून घेवूयात मागील पाच व्यवहाराच्या दिवसात शेयर बाजारात कशाप्रकारचे नुकसान पहायला मिळाले.

 

रतन टाटा यांच्या टीसीएसचे मोठे नुकसान
मागील काही आठवड्यांपासून देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या शेयरमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. कंपनीचा शेयर 3990 रुपयांवरून 3500 रुपयांवर आला आहे. ज्यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपचे नुकसान झाले आहे.

 

टीसीएस मार्केट कॅपमध्ये 41,141.94 कोटींचे नुकसान
जर मागील पाच दिवसांबाबत बोलायचे तर कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 41,141.94 कोटी रुपयांचे नुकसान दिसून आले. ज्यामुळे कंपनीचे एकुण मार्केट कॅप 12,94,686.48 कोटी रुपयांवर आले आहे. तर 14 ऑक्टोबरला कंपनीचे मार्केट कॅप 13,35,838.42 कोटी रुपयांवर होते.

 

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सचे झाले जास्त नुकसान
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेयरमध्ये खुप जास्त तेजी दिसून येत होती. ज्यामुळे कंपनीचे मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. 14 ऑक्टोबरला कंपनीचे मार्केट कॅप 17,11,554.55 कोटी रुपयांवर होते. जे आज 16,66,427.95 कोटी रुपयांवर आले आहे. (Ratan Tata TCS RIL)

या दरम्यान कंपनीच्या मार्केटमध्ये 45,126.60 कोटी रुपयांचे नुकसान दिसून आले होते. शुक्रवारी कंपनीचे तिमाही निकाल पहायला मिळाले जे अंदाजापेक्षा चांगले होते. सोमवारी कंपनीच्या शेयरमध्ये चांगली तेजी दिसून आली.

गुंतवणुकदारांचे 8 लाख कोटीपेक्षा जास्त नुकसान
तर दुसरीकडे बाजार गुंतवणुकदारांना पाच दिवसात 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. प्रत्यक्षात बाजार गुंतवणुकदारांचा फायदा आणि तोटा बीएसईच्या मार्केट कॅपशी संबंधित असतो.

 

बीएसईचे मार्केट कॅप 2,64,39,636.09 कोटीवर
14 ऑक्टोबरला बीएसईचे मार्केट कॅप 2,72,76,704.86 कोटी रुपये होते.
जे शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर 2,64,39,636.09 कोटी रुपयांवर आले.
याचा अर्थ आहे की या दरम्यान गुंतवणुकदारांना 837068.77 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

Web Title :- Ratan Tata TCS RIL | Ratan tata tcs and mukesh ambani ril suffered a loss of more than rs 40000 crores know how

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Life Expectancy Decreased | कोरोनाच्या नंतर 2 वर्षांनी कमी झाले लोकांचे वय; स्डीमध्ये झाला आश्चर्यकारक ‘खुलासा’

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,781 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आधी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मारली ‘बाजी’, जाणून घ्या