4 वेळा होता-होता राहिलं होतं रतन टाटांचं लग्न, आता शेअर केला जवानीतील ‘हिट’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तीन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर आलेले रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर स्वत: चा एक जुना फोटो शेअर केला आहे. 82 वर्षाचे रतन टाटा यांनी लॉस एंजेलिसमधील त्यांचे जुने दिवस आठवून, #ThrowbackThursday सोबत फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी सांगितले की, खरं तर #ThrowbackThursdayआणि #TBT हा लोकप्रिय इंटरनेट ट्रेंड आहे आणि लोक या हॅशटॅगचा वापर करून आपले जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत आले आहे.

रतन टाटा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे फोटो लॉस एंजेलिसमध्ये क्लिक केले गेले होते. 1962 च्या शेवटी रतन टाटा यांनी भारतात परत येण्यापूर्वी लॉस एंजेलिसमध्ये काही काळ काम केले. हा फोटो शेअर केल्यानंतर एका तासात हजारो लोकांनी फोटोला लाइक केले आहे. एकाने कमेंट केली की, ‘धन्यवाद सर, तुम्ही भारतात परत आला आहात.’ दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘कायमचे सर !’

दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘तुम्ही एक ग्रीक देवासारखे दिसता.’ गेल्या वर्षी 30 ऑक्टोबरला रतन टाटा इन्स्टाग्रामवर सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट केले आणि म्हटले की त्याचे चाहते आणि फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर त्यांना फॉलो करू शकतात. ते म्हणाले की, ‘ तुमच्या सर्वांनाही इन्स्टाग्रामवर जॉइन करण्यास मी खूप उत्सुक आहे. बर्‍याच दिवसांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर राहिल्यानंतर, मी खूप भिन्न कम्युनिटीसोबत देवाणघेवाण करण्याची आणि काहीतरी विशेष करण्याची अपेक्षा करतो. ‘

एका वृत्तपत्राशी बोलताना रतन टाटा म्हणाले होते, ‘एकदा माझे लग्न होता होता राहून गेले. मी अमेरिकेत होतो तेव्हा माझ्या आजीने मला अचानक फोन केला आणि मला भारतात येण्यास सांगितले. त्याचवेळी भारताचे चीनबरोबर युद्ध सुरू झाले. अशातच मी तिथेच अडकलो. नंतर त्या मुलीचे लग्न झाले. एवढेच नव्हे तर तिच्या पतीचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळाली.’

रतन टाटा म्हणाले की, ‘काही वर्षांपूर्वी ते बॉम्बे हाऊसच्या कार्यालयात बसले होते मग एका व्यक्तीने त्यांना स्लिप दिली आणि सांगितले की ती पॅरिसमधील एका महिलेने दिली आहे. ते म्हणाले की, ‘ही स्लिप त्या मुलीची होती. त्यांचे स्वतःचे एक कुटुंब आहे, त्यांना मुलेही आहे. जग किती लहान आहे. एक काळ असा होता की आमचा संपर्क नव्हता पण आज आम्ही मित्र म्हणून भेटतो.’

रतन टाटा यांना कुत्रे पाळण्याची आवड आहे. म्हणूनच, ते कुत्र्यांसाठी रुग्णालय बांधत आहे. ते म्हणाले, ‘माझ्या घरी दोन जर्मन शेफर्ड आहेत. आम्ही नवी मुंबईत कुत्र्यांसाठी रुग्णालय बनवत आहोत. कोलाबाच्या अमेरिकन क्लबमध्ये 20 हून अधिक कुत्र्यांना मी खायला घालतो. जेव्हा मला कळले की त्यांना विष देऊन मारण्यात आले आहे. तेव्हापासून मी आजपर्यंत त्या क्लबमध्ये पाऊल ठेवले नाही.

28 डिसेंबर 1937 रोजी, भारतातील सर्वात मोठे आणि प्रामाणिक उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म झाला. रतन टाटा यांच्याकडे अफाट संपत्ती आहे, परंतु असे असूनही ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते येत नाहीत. वास्तविक रतन टाटा आपल्या कमाईपैकी 65 टक्के देणगी देतात. त्यांची कंपनी जे काही नफा कमवते ते समाज कल्याणसाठी देतात. हे पैसे त्याच्या वैयक्तिक आर्थिक विधानात नोंदलेले नाही. म्हणूनच रतन टाटा यांची वैयक्तिक संपत्ती 100 कोटींच्या वर जात नाही.

जेव्हा रतन टाटा यांनी आपल्या कंपनीबरोबर करिअरची सुरूवात केली होती तेव्हा ते चांगल्या पदावर येऊ शकले असते, परंतु तरीही त्यांनी फॅक्टरी कामगारांसोबत काम करण्यास सुरवात केली. असे म्हटले जाते की या माध्यमातून त्यांना हे जाणून घ्यायचे होते की मजुरांचे जीवन काय आहे आणि हा व्यवसाय तयार करण्यासाठी त्याच्या कुटुंबाने किती कष्ट घ्यावे लागते.

फेसबुक पेज लाईक करा –