टाटा ग्रुपचे प्रमुख नसता तर मग काय केलं असतं ? रतन टाटांनी दिलं अनोखं उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘टाटा सन्स’चे रतन टाटा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. ट्विटर पासून ते इन्स्टाग्राम पर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपल्या चाहत्यांशी ते संवाद साधतात. रतन टाटा सोशल मीडियावर त्याने विचार आणि जुन्या आठवणी सांगून लोकांना प्रेरित करतात तसेच त्यांचे काही जुने फोटो देखील शेअर करतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला हजारो लाइक आणि शेअर मिळतात. विशेष म्हणजे ते अनेकवेळा चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील देतात. मागे काही दिवसांपूर्वी त्यांच्या चाहत्यांना अशीच एक संधी मिळाली. लोकांनी त्यांना खूप सारे वैयक्तिक प्रश्न विचारले. विशेष म्हणजे रतन टाटांनी देखील सर्वांना या प्रश्नांची उत्तरं आरामात आणि निवांपणे दिली.

अनेक प्रश्न आणि उत्तरे
रतन टाटांनी 5 सप्टेंबरला त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, त्यात लिहिलं होतं की, ‘माझ्या इनबॉक्स मध्ये खूप सारे प्रश्न आहेत, पण मी या सर्वांचे उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही सर्वांनी अनेक चांगले प्रश्न विचारले आहेत. यापैकी मी काही प्रश्नांची उत्तरं देऊ इच्छितो. इंस्टाग्रामवर एक प्रश्नोत्तरांचं फिचर आहे त्याठिकाणी मी रविवारी संध्याकाळी काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन.’

त्यानंतर रविवारी संध्याकाळी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांचं प्रत्येक उत्तर ऐकून तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल. एका यूजरने त्यांना विचारलं की जर तुम्ही टाटा ग्रुपचे प्रमुख नसता तर मग काय केलं असतं? या प्रश्नाचं उत्तर देत ते म्हणाले, ‘संभवतः मी एक यशस्वी आर्किटेक्ट बनण्याचा प्रयत्न केला असता’. एका युजरने विचारलं, जे लोक इमानदार नसतात त्यांचा सामना कसा करता येईल? या प्रश्नाचं उत्तर देत ते म्हणाले, ‘जो कोणी तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याच्याशी तुम्ही जर इमानदार असाल तर तुम्ही अशा लोकांशी देखील सामना करू शकता.’ एका युजरने विचारलं तुम्ही योग करता का? त्यावर ते म्हणाले, ‘हो रोज संध्याकाळी मी योग करतो.’