रतन टाटांनी इंस्टाग्रामवरील चाहत्यांची जिकंली मनं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी टाटा समूहाचे मानद आणि जेष्ठ उद्योजक रतन टाटा सक्रिय झाले आहेत. 82 वर्षांच्या रतन टाटांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडलं. बघता बघता इन्स्टाग्रामवर त्यांच्या फॉलोवर्सच्या आकड्याचा टप्पाही 10 लाखांच्या पार गेला आहे. ट्विटर, फेसबुकपाठोपाठ आता ते इन्स्टाग्रामवर काही ना काही पोस्ट करत असतात. आनंदात त्यांनी एक पोस्ट केली आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हणाले, “मी पाहीले आहे की, इन्स्टाग्रामवरील लोकांची संख्या लाखोंच्या घरात गेली असून, माझ्यासाठी तो एक मैलाचा दगड ठरला आहे.”

पुढे ते म्हणाले, “हा एक अद्भुत ऑनलाइन परिवार आहे. मी इन्स्टाग्रामवर खातं उघडण्यापूर्वी असा विचारही केलेला नव्हता. माझा असा विश्वास आहे कि इंटरनेटच्या या युगात आपण दिलेला प्रतिसाद हा कोणत्याही इतर संख्येपेक्षा खूपच जास्त आहे. मला या गोष्टी खूप आनंदित करतात आणि आशा आहे की एकत्र आपला प्रवास चालू राहील. आपल्या समुदायाचा एक भाग बनणे आणि आपल्याकडून शिकणे खरोखर रोमांचक आहे.”

३ लाखांहून अधिक लोकांनी रतन टाटांची पोस्ट लाईक केली काहींनी यावर कमेंटही केली. रतन टाटांचा अभिनंदन करताना एक युजरनं उपरोधिक भाषेत “छोटू” असा उल्लेख केल्याने त्याला अनेकांनी ट्रोल केलं.

इन्स्टाग्रामवर एका युजर्सनं रतन टाटांना उद्देशून अभिनंदन छोटू, असं उद्देशून लिहिल्यानं अनादर करणारी आणि लज्जास्पद भाषा वापरल्याची टिप्पणी करत अनेकांनी त्या युजरवर इन्स्टाग्रामवरून हल्ला चढवला आहे. त्या व्यक्तीनं छोटू हा शब्द प्रेमापोटी केला आहे असं त्यानं सांगितलं.

कमेंट करणारी तरुणी बचाव करताना म्हणाली, मी प्रेमातून काहीही बोलू शकते. त्या तरुणीला ट्रोलर्स ट्रोल करत असताना स्वतः रतन टाटा तिच्या मदतीला धावून आले . कृपया या तरुणीस सन्मानपूर्वक वागणूक द्या असं म्हणत म्हणाले “आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं आणि शेवटी त्यांनी हसऱ्या चेहऱ्याचं स्माइली टाकली . टाटांच्या या कंमेंट ला ४००० लाईक्स आले आहेत . एका व्यक्तीने तुम्ही खरोखरंच ग्रेट आहात सर, असं लिहलं . रतन टाटाच सर्व स्तरातून कौतुक केलं गेलं आहे