परिस्थितीत सुधारणा नाही, ‘इकॉनॉमी’मध्ये आता 9 टक्क्यांच्या घसरणीचा अंदाज , S&P नं सांगितलं

नवी दिल्ली : एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सने चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थ व्यवस्थेत 9 टक्केच्या घसरणीचा अंदाज लावला आहे. यापूर्वी रेटिंग एजन्सीने भारतीय अर्थव्यवस्थेत 5 टक्के घसरणीचा अंदाज लावला होता.

रेटिंग एजन्सी एस अँड पी ने सोमवारी 2020-21 साठी भारताचा विकासदराचा अंदाज घटवून मायनस 9 टक्के केला आहे. एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स आशिया-प्रशांतचे अर्थतज्ज्ञ विश्रुत राणा यांच्यानुसार कोरोना संकटामुळे खासगी आर्थिक हालचाली वेग पकडलेला नाही. कारण कोरोना प्रकरणे सतत वाढत चालली आहेत.

अमेरिकन रेटिंग एजन्सीचे म्हणणे आहे की, या महामारीमुळे भारतात वैयक्तिक खर्च आणि गुंतवणूक मोठ्या कालावधीपार्यंत खालच्या स्तरावर राहील. यापूर्वी एस अँड पीने भारतीय अर्थव्यवस्थेत 5 टक्के घसरणीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रेटिंग एजन्सीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 23.9 टक्केची घसरण नोंदली गेली आहे, जी अपेक्षेपेक्षा जास्त आहे.

रेटिंग एजन्सीचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमध्ये सूट देऊनही लोक घरातून बाहेर पडणे टाळत आहेत, कारण कोरोनाची प्रकरणे वाढत चालली आहेत. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, जोपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवले जात नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेत तेजीने रिकव्हरीची आशा नाही.

यापूर्वी रेटिंग एजन्सी मूडीज आणि फिचने सुद्धा भारताच्या वृद्धी दराचा अंदाज घटवला आहे. मूडीजने चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 11.5 टक्के तथा फिचने 10.5 टक्केच्या घसरणीच अंदाज वर्तवला आहे.