Ration Card शिवाय सुद्धा हे लोक घेऊ शकतात सबसिडीचे धान्य, सरकार ‘या’ प्लानवर करतंय काम; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेशन कार्ड (Ration Card) नसल्याने अनेक गरजूंना अजूनही सबसिडीचे धान्य मिळत नाही. परंतु आगामी काळात बेघर आणि निराधार लोकांना सुद्धा सबसिडीचे (Subsidy) धान्य मिळू शकते. अशा लोकांना मोफत धान्य पुरवण्यासाठी सरकार योजना बनवत आहे आणि या अंतर्गत लवकरच एक पोर्टल लाँच केले जाईल. (Ration Card)

 

एनजीओ (बिगर-सरकारी संस्था) आणि इतर सिव्हिल सोसायटी संघटना अन्य सिव्हिल सोसायटी संघटना या वेबसाइट/पोर्टलद्वारे त्या गरजू लोकांचे रजिस्ट्रेशन करतील. केंद्र ही नावे (लाभार्थी) विविध राज्यांना पाठवेल, जेणेकरून त्या लोकांना पीडीएस लाभार्थी यादीत समावेश करता येईल.

 

केंद्रीय अन्न सचिव सुधांशु पांडे यांच्या संदर्भाने एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे की, सध्या ज्या लोकांना जास्त सबसिडी मिळणार्‍या या धान्याची गरज आहे, त्यांना ते मिळत नाही. कारण त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. रेशन कार्ड बनवणे खुप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि सर्वात कमजोर वर्गाला ते मिळवणे जवळपास अशक्य आहे. खरं तर हा अधिकार त्यांना प्रथम मिळाला पाहिजे. (Ration Card)

सुशासन सप्ताहाचा एक भाग म्हणून झालेल्या एका चर्चेत भाग घेताना पांडे यांनी सांगितले की, त्यांच्या मंत्रालयाने एनआयसीला अशा कमजोर आणि सर्वात योग्य लोकांचा डेटा जमवण्यासाठी एक राष्ट्रीय पोर्टलसह येण्यास सांगितले आहे.

 

ते पुढे म्हणाले, एनजीओ त्यांना पोर्टलवर नोंदणी करण्यास मदत करू शकतात.
नंतर आम्ही संबंधित राज्यांना त्यांना लाभार्थ्यांच्या यादीत सहभागी करण्यासाठी सांगू.
अशा लाभार्थ्यांची ओळख पॉइंट ऑफ सेल (POS) मशीनच्या मदतीने बायोमेट्रिक पडताळणीचा वापर करून पटवता येऊ शकते.

 

Web Title :- Ration Card | homeless people will get high subsidy food grains without ration cards

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan Yojana | 5 दिवसानंतर PM मोदी कोट्यवधी शेतकर्‍यांना देणार खुशखबर ! खात्यात येतील 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम अन्यथा रखडू शकतो हप्ता

ST Workers Strike | ‘मी खुर्चीत असतो तर…’, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन नाना पटोलेंनी व्यक्त केली नाराजी

Pune Crime | पुण्याच्या कर्वेनगर परिसरात भरदिवसा 20 वर्षीय युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून; प्रचंड खळबळ

Pune Crime | ‘पुणे ग्रामीण’ची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरातून 50 लाखाचा गांजा जप्त; 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक