Ration Card वर मिळतील अनेक फायदे, जर अजूनपर्यंत बनवले नसेल तर ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : रेशन कार्ड (Ration card) सध्या खुप महत्वाच्या डॉक्यूमेंट (Important Documents) पैकी एक आहे. रेशन कार्डद्वारे सरकार राज्यातील गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. रेशन कार्डचा वापर अनेक ठिकाणी आयडी प्रूफ (Id Proof) म्हणून केला जातो. कुणीही भारतीय नागरिक यासाठी अप्लाय करू शकतो. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची नावे आपल्या वडिलांच्या कार्डमध्ये नोंदली जातात. तर 18 पेक्षा जास्त वय असलेले रेशन कार्डसाठी (Ration card) अप्लाय करू शकतात. रेशन कार्ड बनवण्याच्या दोन पद्धती आहेत. याबाबत जाणून घेवूयात.

असा करा अर्ज

1. रेशन कार्डसाठीचा अर्ज जवळच्या पुरवठा कार्यालयातून घेऊ शकता. किंवा अन्नधान्य पुरवठा आणि ग्राहक विभागाच्या वेबसाइटवर अथवा राज्याच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता.

2. तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याच्या वेबसाइटवर अर्ज करू शकता.

3. रेशन कार्ड 2 प्रकारची असतात. पहिले, गरीबी रेषेच्या खालील लोकांसाठी आणि दुसरे गरीबी रेषेच्या वरील लोकांसाठी. तुम्ही ज्या श्रेणीत येता, त्याच आधारावर रेशन कार्ड बनवू शकता. https://nfsa.gov.in/portal/apply_ration_card च्या वेबसाइटवर जाऊन रेशन कार्ड बनवू शकता.

4. रेशन कार्डसाठी माहिती भरा. आवश्यक डॉक्युमेंट्स जोडा.

5 आवश्यक अर्ज शुल्क भरा. बीपीएल / एएई कार्डसाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल.

6. हा अर्ज जवळच्या कार्यालयात जमा करा. 15 दिवसानंतर रेशन कार्ड घरी येईल.

रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

मतदान कार्ड / मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, अ‍ॅड्रेस प्रुफ, कुटुंब प्रमुखाचे 2 पासपोर्ट साइज फोटो, वीज/पाण्याचे बिल/टेलीफोन बिल (कोणतेही एक), भारत सरकार द्वारे जारी कोणतेही कागदपत्र जर असेल.

हे देखील वाचा

Pune-Bangalore Highway | शुक्रवारपासून बंद असलेली पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक आज सुरु होण्याची शक्यता

Pune News | भाजपच्या महिला नगरसेविकांना ‘एकाधिकारशाही’चा असाही फटका ! महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपी संचालक पदाच्या दावेदार ‘तापकीर’ यांची ‘पक्ष उपाध्यक्ष ‘ पदावर ‘बोळवण’

Monsoon Tips | पावसाळ्यात घरात ओलावा येतो का? उपयोगी पडतील ‘या’ सोप्या टिप्स; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ration Card | how to apply for ration card check step by step process details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update