Ration card | घर बदलताना रेशन कार्ड हस्तांतरण करायचंय? जाणून घ्या एकदम सोपी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ration card | भारतीय नागरिकांना महत्वपूर्ण जे दस्तऐवज अथवा कागदपत्र हे रेशन कार्ड असते. कोणत्याही सरकारी कामामध्ये रेशन कार्डाची (Ration card) आवश्यकता असते. विशेष म्हणजे रेशन कार्डला राज्य सरकारद्वारे (State Government) जारी केले जाते. याच्या माध्यमातून कुटुंबांची त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार गरीबी रेषेवरती (APL) आणि गरीबी रेषेखाली (BPL)अशी विभागणी करण्यास साहाय्य ठरते. यामुळे नागरिकांना मोजक्या किंमतीत धान्याची उपल्बधता होते.

रेशन कार्डचे 3 प्रकार –

1. पांढरे कार्ड – वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असणाऱ्यांना हे कार्ड दिले जाते.

2. केशरी कार्ड – 50 ते 1 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना हे कार्ड दिले जाते.

3. पिवळे कार्ड – वार्षिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असणाऱ्यांना हे कार्ड दिले जाते. हे बीपीएल धारकांना जारी होते.

Ration Card Transfer कसे कराल?

रेशन कार्ड एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रांसफर करण्यासाठी ग्राहकाला त्यांच्या अधिकार क्षेत्रातील फूड ऑफिसमध्ये जावे लागेल. यासाठी तुम्हाला एक लिखित अर्ज, रहिवासी पुरावा आणि शुल्क जमा करावे लागेल. यानंतर ट्रांसफरची प्रक्रिया सुरू होणार आहे.

आवश्यक कागदपत्रं –

– अर्जदाराचे 3 पासपोर्ट साइज फोटो,

– रहिवाशी पुराव्यासाठी – (सरकार अथवा सार्वजनिक सेक्टरमधील उपक्रमांद्वारे जारी ओळखपत्र)

– लेटेस्ट टेलिफोन बिल

– एलपीजी गॅस पावती

– ड्राइव्हिंग लायसन्स

– पासपोर्ट

– मतदान ओळखपत्र

– स्वतःचे घर असल्यास लेटेस्ट टॅक्स पावती

– भाड्याचे घर असेल तर भाडे दिलेली पावती वापरू शकता. पावतीवर घराच्या मालकाचे नाव व पूर्ण पत्ता असावा.

– तसेच, इतर कोणताही रहिवाशी पुरावा देखील चालेल.

या दरम्यान, जमा केल्यावरच नवीन प्रक्रिया सुरू होईल. नवीन BPL रेशन कार्डसाठी 5 रुपये आणि APL साठी 10 रुपये शुल्क आहे. तसेच, कॉम्प्युटराइज्ड कार्डसाठी 45 रुपये फी घेतली जाते. कोणतीही भारतीय व्यक्ती स्वतःचे रेशन कार्ड तयार करू शकत नाही.

हे देखील वाचा

Maharashtra School Reopen | पुढील आठवड्यात शाळा सुरु करण्याचा विचार?

NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई ! आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक, तस्कराच्या हल्ल्यात एनसीबीचे 2 अधिकारी जखमी

Pune Corporation | पुणे महापालिकेची अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी ‘अभय योजना’; जाणून घ्या दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ration Card | how to transfer ration card important tips to know

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update