
Ration Card Link To Aadhaar Card | रेशन कार्डबाबत केंद्र सरकारचा निर्णय; ‘या’ मुदतीपर्यंत करा Update
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ration Card Link To Aadhaar Card | देशातील सर्वसामान्यांचा आधार म्हणजे रेशन कार्ड (Ration Card) आहे. रेशन कार्ड धारकांना रेशनिंग लागू झाल्यानंतर युद्धाच्या वेळी किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अल्प प्रमाणात उपलब्ध असलेले अन्न किंवा इतर वस्तू मिळण्याची सुविधा देते. दरम्यान रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक (Ration Card Link To Aadhaar Card) करण्यासाठी 31 मार्च ही मुदत केंद्र सरकारकडून (Central Government) देण्यात आली होती. आता ती मुदत वाढवण्यात आली आहे. 31 मार्चऐवजी 30 जून करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारकडून आणखी एक संधी देण्यात आली आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (Department of Food and Public Distribution) याबाबत माहिती दिली आहे. रेशन कार्डधारकांना (Ration Card Holder) सरकारकडून कमी दरात धान्य दिलं जातं. केंद्र सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड (One Nation One Ration Card) योजनेअंतर्गत देशात लाखो लोकांना याचा फायदा मिळतो. आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केल्यानंतर वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्डच्या माध्यमातून अन्य कोणत्याही राज्यातील रेशन धान्य दुकानातून धान्य घेता येते. ही एक सुविधा केली आहे.
असं करा ऑनलाइन लिंक –
– प्रथम अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.
– इथे Start Now वर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा पत्ता, जिल्हा, राज्य असे डिटेल्स भरावे लागतील.
– त्यानंतर ‘Ration Card Benefits’ वर क्लिक करा.
– इथे आधार नंबर, रेशन कार्ड नंबर, ईमेल, मोबाइल नंबर डिटेल्स भरा.
– त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल. OTP टाका.
– त्यानंतर स्क्रिनवर प्रोसेस पूर्ण झाल्याचा मेसेज येईल.
– त्यानंतर आधार वेरिफाय होईल आणि तुमचं आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक होईल.
असं करा ऑफलाइन लिंक –
रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी काही डॉक्युमेंट (Document) आधार कार्ड कॉपी, रेशन कार्ड कॉपी आणि रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट साइज फोटो रेशन कार्ड केंद्रात जमा करावा लागेल. त्याशिवाय रेशन कार्ड केंद्रात तुमचे आधार कार्ड बायोमेट्रिक डेटा वेरिफिकेशनही होऊ शकते.
Web Title :- Ration Card Link To Aadhaar Card | ration card link to aadhaar card date extend 30 june 2022 check benefits
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update