आता नवीन रेशनकार्ड मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, फक्त ‘ही’ कागदपत्रे महत्वाची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या नागरिकांचे रेशनकार्ड कोणत्याही कारणास्तव बनलेले नाहीत. त्यांना आता त्यांचे नवीन रेशन कार्ड बनवता येणार आहे. रेशन कार्ड बनविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण झाल्यास चार ते पाच दिवसांत रेशनकार्ड तयार होते. नवीन कार्डे तयार करण्याबरोबरच ती एकाच वेळी ऑनलाईनही केली जात आहेत. दरमहा सुमारे दीड हजार नवीन कार्डे तयार केली जातात. जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या मते, जर सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर एका आठवड्यात कार्ड मिळेल.

राशनकार्ड बनवण्यासाठी ही महत्वाची कागदपत्रे गरजेची

1) घरातील प्रमुख व्यक्तीचे ओळखपत्र, मतदान ओळखपत्राची फोटोकॉपी

2) घरातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डची फोटोकॉपी

3) घरातील प्रमुख व्यक्तीच्या बँक पासबुकची फोटोकॉपी

4) जुने किंवा रद्द झालेले रेशनकार्ड

5) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असल्यास उत्पन्नाचा दाखला

6) घरातील प्रमुख व्यक्तीचे २ पासपोर्ट फोटो

7) गॅस एजन्सीच्या कनेक्शनच्या पुस्तकाची प्रत