Ration Card Latest News : रेशन घेण्यात तुम्ही करताय ‘ही’ चूक तर व्हा सावध, होऊ शकते 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पोलीसनामा ऑनलाईन : जनतेला मोठा दिलासा देत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशभरात वन नेशन, वन रेशन कार्ड सुरू केले आहे. यावेळी रेशनकार्डमध्ये नावे जोडण्याचे आणि नाव हटवण्याचे काम जोरात सुरू आहे. ज्यामध्ये अनेक ठिकाणाहून फसवणूकीचे अहवालही येत आहेत. अशी प्रकरणेही समोर आली आहेत, ज्यात लोक मृत व्यक्तीच्या नावावरही रेशन वाढवत आहेत.

परंतु आता अशा प्रकारच्या फसवणूकी रोखण्यासाठी सरकारने कठोर नियम बनवले आहेत. ज्यामध्ये रेशनकार्डवर नोंदणीकृत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही एखादी व्यक्ती फसव्या पद्धतीने नाव रेशनमध्ये ठेवते किंवा रेशन त्याच्या नावावर करते तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. त्याला जेलची हवा देखील खावी लागू शकते.

रेशन कार्ड बनवण्यासाठी काही नियम व शर्ती पाळणे फार महत्वाचे आहे. आता जे खरोखरच पात्र आहेत त्यांना रेशन देण्याची तरतूद आहे. बरेच लोक दारिद्र्य रेषेखालील किंवा अंत्योदय योजनेच्या खाली चुकीची कागदपत्रे देतात आणि त्यांचे रेशन कार्ड बनावट स्वरूपात मिळवतात. परंतु बनावट रेशन कार्ड बनविणे अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा आहे. जर कोणी दोषी आढळल्यास त्याला पाच वर्षे तुरूंगवास आणि दंड होऊ शकतो. याखेरीज आता एखादी व्यक्ती रेशनकार्ड मिळविण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्यास लाच देत असेल किंवा एखादी व्यक्ती लाच घेऊन रेशनकार्ड बनवून देेत असेेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. त्याला तुरूंग आणि दंड भरावा लागू शकतो.

विशेष म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संपूर्ण देशात वन नेशन वन रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधा सुरू केली आहे. ज्यासह देशातील जवळपास सर्व राज्ये जोडली गेली आहेत. या नव्या नियमानुसार कोणताही कार्डधारक देशातील कोणत्याही कोपऱ्यात आपला रेशन घेऊ शकतो. रेशन घेण्यासाठी राज्याचे नागरिक होण्याचे बंधनही दूर केले गेले आहे.