Ration Card | रेशन कार्डमध्ये अपडेट करा स्वतःचा मोबाइल नंबर, नेहमी मिळेल ‘लाभ’; जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर रेशन कार्डवर तुम्ही चुकीचा नंबर टाकला असेल किंवा नंबर बदलला असेल आणि कार्ड अपडेट झालेले नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. यासाठी तुम्ही उशीर न करता रेशन कार्डमध्ये (Ration Card) आपला मोबाइल नंबर अपडेट (Update Your Mobile Number) करा.

रेशन कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट करणे अतिशय सोपे आहे. तुम्ही घरबसल्या सहज हे काम करू शकता. जर तुम्ही रेशन कार्डमध्ये जुना मोबाइल नंबर टाकला असेल तर तुम्हाला रेशन संबंधी अपडेट मिळणार नाही. विभागाकडून दररोज मेसेजद्वारे अपडेट पाठवले जाते.

1. प्रथम ही साईट https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx वर व्हिजिट करा.

2. एक पेज ओपन होईल. येथे Update Your Registered Mobile Number दिसेल.

3. या खालील कॉलममध्ये माहिती भरा.

4. कॉलममध्ये Aadhaar Number of Head of Household/NFS ID लिहा.

5. दुसर्‍या कॉलममध्ये Ration card No लिहा.

6. तिसर्‍या कॉलमध्ये Name of Head of Household लिहा.

7. शेवटच्या कॉलमध्ये नवीन मोबाइल नंबर लिहा आणि सेव्ह करा.

8. आता मोबाइल नंबर अपडेट होईल.

’वन नेशन-वन रेशन कार्ड’ सुरू
देशातील 20 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये एक जून 2020 पासून रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा ’वन नेशन-वन रेशन कार्ड’ सुरू झाले आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही राज्यात राहून रेशन खरेदी करू शकता. आंध्र प्रदेश, तेलंगना, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि दमन-दीवमध्ये अगोदरच ही योजना लागू आहे.

Web Titel :- Ration Card | ration card latest news how to change mobile number in ration card know here easy steps to update one nation one ration scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,685 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Shocking ! 10 व्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडली जुळी मुले, Live Streaming मध्ये रमलेल्या आईला ओरडण्याचा आवाजही आला नाही

Maharashtra Rains | राज्यभरात ‘धो-धो’ पावसाची शक्यता, आगामी 2 दिवस पुण्यात ‘हाय अलर्ट’