Ration Card | रेशनकार्ड अजूनही केले नसेल आधारसोबत लिंक, तर घरबसल्या आजच करा; जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ration Card | राज्य आणि केंद्र सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी आणखी अनेक योजना राबवत आहे, त्यातील महत्त्वाची म्हणजे मोफत रेशन योजना (Free Ration scheme). या योजनेअंतर्गत, कमी उत्पन्न गटातील लोकांना मदत करण्यासाठी सरकार दरमहा मोफत रेशन पुरवते. प्रत्येक रेशनकार्डधारक कुटुंबाला दर महिन्याला गहू (Wheat), तांदूळ (Rice), डाळ (Pulses) इ. मोफत किंवा अत्यंत कमी किमतीत दिले जाते. (Ration Card)

 

कोरोना (Corona) महामारीच्या काळात सरकारने सुमारे 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिले होते. अशा स्थितीत, जर तुम्हालाही मोफत रेशन योजनेच्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर आधी रेशनकार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही ओळखपत्रासाठी तुमचे रेशनकार्ड देखील वापरू शकता.

 

रेशनकार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक
रेशनकार्डवरून मोफत रेशन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर एक काम करावे लागेल. ते काम म्हणजे रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक (Ration Card – Aadhaar Card Link) करणे. तुमची बायोमेट्रिक माहिती आधार कार्डमध्ये नोंदवली जाते, जी तुमची ओळख आहे.

 

अशा स्थितीत तुमचे रेशनकार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक (Aadhaar – Ration Card Link) करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर लवकरात लवकर लिंक करा, अन्यथा तुमचे मोफत रेशन बंद होऊ शकते.

अशा प्रकारे करा रेशनकार्ड आधारशी लिंक

1. सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.

2. तिथे दिलेल्या Start Now या पर्यायावर क्लिक करा.

3. पत्त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव, राज्य इत्यादी माहिती भरा.

4. रेशन कार्ड Benefit पर्याय निवडा.

5. आधार कार्ड क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक आणि ईमेल आयडी नोंदवा.

6. त्यानंतर Registered Mobile Number वर ओटीपी येईल.

7. ओटीपी टाकताच आधार क्रमांक पडताळला जाईल.

8. यानंतर रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.

 

Web Title :- Ration Card | ration card link to aadhar card it is important for free ration scheme see details here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Brain Dead | विवाहाच्या आदल्या दिवशी मुलीचा मेंदूविकाराने मृत्यु; दु:खात असलेल्या कुटूंबीयांनी घेतला धाडसी निर्णय

 

Almonds Side Effects | आरोग्यासाठी लाभदायक आहेत बदाम, परंतु ‘या’ 5 लोकांसाठी ठरू शकतात नुकसानकारक

 

Sambhaji Raje | खासदार संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार’