Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ration Card Rules Changed | रेशन कार्ड धारकांसाठी (Ration Card Holder) एक महत्वाची माहिती समोर येत आहे. मोदी सरकारकडून (Modi Government) रेशनच्या नियमात मोठा बदल (Ration Card Rules Changed) करण्यात आला आहे. सरकारकडून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत गहू (Wheat) आणि तांदूळ (Rice) वाटप केले जातेय. हे वितरण पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (PM Poor Welfare Food Scheme) दिले जाते. आता या योजनेत गव्हाऐवजी तांदूळ दिला जाणार आहे. असे झाल्यास जूनपासून तुम्हाला गहू कमी आणि तांदूळ अधिक मिळणार आहे.

गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. या बदलानंतर यूपी (UP), बिहार (Bihar) आणि केरळमध्ये (Kerala) गहू मोफत वितरणासाठी उपलब्ध होणार नाही. त्याचबरोबर दिल्ली (Delhi), गुजरात (Gujarat), झारखंड (Jharkhand), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), महाराष्ट्र (Maharashtra), उत्तराखंड (Uttarakhand) आणि पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) गव्हाचा कोटा कमी केला आहे. या राज्यात रेशन कार्डधारकांना गहू कमी आणि तांदूळ अधिक मिळेल. बाकी राज्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

अन्न सचिव सुधांशू पांडे (Food Secretary Sudhanshu Pandey) म्हणाले, ”उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गव्हाचे वाटप संपुष्टात येण्याचे कारण गव्हाची कमी खरेदी असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान जवळपास 55 लाख मेट्रिक टन तांदळाचे अतिरिक्त वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.”

Web Title : Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त