Ration Card Services | आता रेशन कार्डसंबंधी प्रत्येक समस्येचे तात्काळ होईल निवारण, ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर मिळतील ‘या’ सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Ration Card Services | देशभरात 3.7 लाखापेक्षा जास्त कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs) मध्ये आता रेशन कार्ड संबंधीत सेवा (Ration Card Services) सुद्धा उपलब्ध होतील. या सेंटर्सवर रेशन कार्डसंबंधी प्रत्येक समस्येचे निवारण केले जाईल. या सेवांमध्ये नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे, माहिती अद्ययावत करणे आणि ते आधारसोबत लिंक करणे इत्यादीचा समावेश आहे.

या उपक्रमामुळे देशभरातील 23.64 कोटी रेशन कार्डधारकांना थेट फायदा मिळेल.
ग्राहक प्रकरणे, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयांतर्गत
काम करणारे विशेष युनिट सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडसोबत यासाठी करार केला आहे.

सीएससीमध्ये रेशन कार्डधारकांना मिळतील या सेवा

रेशन कार्डधारक जवळच्या सीएससीवर जाऊन आपल्या डिटेल्स सहज अपडेट करू शकतील.
कार्डची डुप्लिकेट कॉपी मिळवता येईल, कार्ड आधारसोबत जोडता येईल, रेशनची उपलब्धता जाणून घेणे आणि तक्रार करणे सोपे होईल.

नवीन रेशन कार्डसाठी सुद्धा सीएससीवर करू शकता अर्ज

सध्याचे रेशन कार्डधारक नवीन रेशन कार्डसाठी जवळच्या सीएससीमध्ये जाऊन अर्ज करू शकतात.
सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी यांनी म्हटले की, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासोबत आमच्या भागीदारीनंतर सीएससीचे संचालन करणारे गाव स्तरावरील आमचे केंद्र चालक ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांच्यापर्यंत पोहचतील.

 

Web Title : Ration Card Services | ration card problems related to ration card will be solved immediately many services will be available on csc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Post Office Scheme | 1500 रुपये महिना करा जमा, मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या सर्वकाही

Indian Railways Rules | ट्रेनच्या प्रवासात तिकिटासोबत रेल्वे देते ‘या’ 5 जबरदस्त सुविधा, जाणून घ्या कोणत्या

FD मध्ये Investment करताना ‘या’ 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक, गुंतवणुकीवर होतो थेट परिणाम; जाणून घ्या