Ration Card मध्ये नाव जोडण्याबाबत झाला आणखी एक मोठा निर्णय; जाणून घ्या कुणावर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राज्य सरकारांनी सेक्स वर्कर्सचे रेशन कार्ड बनवण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना काळात रेशन कार्डबाबत पुन्हा नवीन निर्णय घेतले जात आहेत. आता केंद्र सरकारच्या निर्देशानंतर काही राज्य सरकारांनी गंभीर रोगांनी ग्रस्त लोकांचेसुद्धा रेशन कार्ड बनवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील काही राज्य सरकारांनी गरीब कॅन्सर रुग्ण, कुष्ठ आणि एड्स रुग्णांना आता फ्री रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने याची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. झारखंड सरकारने म्हटले की, आता सेक्स वर्कर्सनंतर गंभीर रोगांनी ग्रस्त लोकांना फ्रीमध्ये रेशन दिले जाईल.

असा करावा रेशन कार्डसाठी अर्ज

झारखंडमध्ये गंभीर रुग्ण आता ऑफलाइन किंवा ऑनलाइन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतात. झारखंड सरकारच्या सार्वजनिक वितरण आणि ग्राहक प्रकरण विभागाने यासंबंधी आदेश जारी केला आहे. झारखंड सरकारची अधिकृत वेबसाइट www.aahar.jharkhand.gov.in वर तुम्ही ऑनलाइनसुद्धा अर्ज करू शकता. याच्यासोबतच राज्याचे जिल्हा पुरवठा कार्यालय आणि पंचायत कार्यालयातसुद्धा ऑफलाइन अर्ज करू शकता.

सेक्स वर्करनंतर कॅन्सर, एड्स आणि कुष्ठ रुग्णांना फ्रीमध्ये रेशन

काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने देशाच्या सर्व राज्य सरकारांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सेक्स वर्कर्सना रेशन देण्याचा आदेश जारी केला होता. सेक्स वर्कर्सना यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय दिले आहेत. राज्य सरकारांनी जिल्हा प्रशासनाला यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सेक्स वर्कर्सची ओळख आणि पत्ते गोपनीय ठेवले जातील.

रेशन कार्ड बनवणे राज्य सरकारांची जबाबदारी आहे. रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, सरकारी बँकेत खाते, व्हाेटर आयडी, पासपोर्ट, सरकारी आयकार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी एक असेल तर रेशन कार्ड बनवता येते.