Ration Card | अपात्र रेशन लाभार्थ्यांना झटका, सरकार उचलत आहे मोठे पाऊल; जाणून घ्या

नवी दिल्ली : Ration Card | जर सरकारद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या रेशनचा फायदा तुम्हाला सुद्धा मिळत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकार लवरकच रेशन कार्ड (Ration Card) योजनेत मोठा बदल करणार आहे, ज्यामध्ये अपात्र लोकांना लाभ मिळणार नाही. मानक बदलण्याचा आराखडा जवळपास पूर्ण झाला आहे. याबाबत राज्यांसोबत मागील सहा महिन्यांपासून बैठकीच्या अनेक फेर्‍या सुद्धा झाल्याचे सचिव सुधांशु पांडेय यांनी सांगितले आहे.

– संपन्न लोकांना सुद्धा मिळत आहे योजानेचा फायदा

अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाने दावा केला आहे की, देशभरात सुमारे 80 कोटी लोक नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्टचा लाभ घेत आहेत. यामध्ये अनेक लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, हे लक्षात घेवून सार्वजनिक वितरण मंत्रालय मानकांमध्ये बदल करत आहे.

या महिन्यात हे मानक फायनल केले जातील. नवीन मानक लागू झाल्यानंतर केवळ पात्र व्यक्तींना फायदा होईल. अपात्र लोक फायदा घेऊ शकणार नाही. हा बदल गरजूंना लक्षात घेऊन केला जात आहे.

तसेच, विभागाची आतापर्यंत ’वन नेशन, वन रेशन कार्ड योजना’ डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्य
आणि यूटीमध्ये लागू झाली आहे. सुमारे 69 कोटी लाभार्थी म्हणजे एनएफएसएच्या अंतर्गत येणारी
लोकसंख्या या योजनेचा लाभ घेत आहे. प्रति महिना सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून
दुसर्‍या ठिकाणी जाऊन सुद्धा लाभ घेत आहेत.

हे देखील वाचा

LIC Special Revival Campaign | बंद पडलेली LIC पॉलिसी पुन्हा करू शकता सुरू, जाणून घ्या कोणत्या अटींचे करावे लागेल पालन

Pune Farmer Suicide | आत्महत्येनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील पण, माझे वडील पुन्हा परत येतील का?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ration card shock ineligible ration beneficiaries

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update