Ration card Update | बदलला असेल तुमच्या घरचा पत्ता तर रेशन कार्डमध्ये असा करू शकता अपडेट, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात रेशनकार्ड (Ration card Update) हे महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून वापरले जाते. यासोबतच शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डचा वापर केला जातो. रेशनकार्डमध्ये चुकीची माहिती भरली गेली असेल किंवा रेशनकार्डमध्ये काही अपडेट करायचे असेल तर केंद्र सरकार लोकांना वेळोवेळी अपडेट करण्याची संधी देते. तुम्ही ऑनलाइनद्वारेही दुरुस्ती करू शकता. याशिवाय, घरचा पत्ता बदलला असेल तरीही, तुम्ही तो ऑनलाइन बदलू शकता. (Ration card Update)
याशिवाय केंद्र सरकारकडून ’वन नेशन वन रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकार (Central Government) ने शिधापत्रिकेत लवचिकता आणण्यासाठी हे केले होते. जेणेकरुन लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत अनुदानित अन्नधान्याचा मासिक कोटा घेऊ शकेल. (Ration card Update)
या योजनेत रेशनकार्ड नसलेल्या स्थलांतरितांना 2 महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जात आहे. या योजनेंतर्गत देशातील कोणत्याही भागातील रेशन दुकानांमध्ये त्याचा वापर करता येईल.
गेल्या वर्षी जूनमध्ये ही योजना जाहीर करण्यात आली होती. जी आता हळूहळू इतर राज्यांमध्येही लागू केली जात आहे. दरम्यान, जर तुम्हाला रेशनकार्डमध्ये घरचा पत्ता बदलायचा असेल तर तुम्ही तो सहज बदलू शकता. ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
असा बदला रेशन कार्डमधील पत्ता
- प्रथम PDS पोर्टल ऑफ इंडिया pdsportal.nic.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
- येथे मुख्यपृष्ठाच्या वरच्या डाव्या बाजूला उपलब्ध राज्य सरकार पोर्टल्स टॅबवर क्लिक करा.
- यानंतर येथे राज्यांची यादी उघडेल. आता तुमचे संबंधित राज्य निवडा.
- राज्य निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याशी संबंधित वेगळ्या पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
- रेशन कार्ड पत्ता बदलण्याचा फॉर्म किंवा शिधापत्रिकेच्या फॉर्ममधील बदलाशी संबंधित एक योग्य लिंक निवडावी लागेल. प्रत्येक राज्यासाठी ती वेगळे असेल.
- आता तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून तुमच्या खात्यात लॉग इन करा.
- दुरुस्ती फॉर्म योग्यरित्या भरा आणि नंतर सबमिट करा.
- भविष्यातील संदर्भासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.
- हे पोर्टल वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगळे आहे आणि सहजपणे या स्टेपचा वापर करून बद करू शकता.
Web Title :- Ration Card Update | your home address has changed so you can update your address in the ration card know process
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Online Ration Card | रेशन कार्डसंबंधी आता ‘या’ सुविधा मिळणार ऑनलाइन, कशी आहे पद्धत?
Tax Planning | इन्कम टॅक्स वाचवण्याच्या 7 पद्धती, 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ उपाय