राम, लक्ष्मण, सीता, महादेव यांच्या नावानं बनले होते ‘रेशनकार्ड’ ! गावकऱ्यांनी ‘अशी’ केली ‘पोलखोल’

पोलिसनामा ऑनलाइन –देवाच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असेल किंवा ऐकल्या असेल. असंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात एका ठिकाणी देवाच्या नावानं रेशनकार्ड बनवून गरीबांचं रेशन लुटण्याचं काम सुरू होतं.

धौलपूर जिल्ह्यातील काही रेशन डिलरनं देवाच्या नावावर रेशनकार्ड बनवले होते. गेल्या 3-4 वर्षांपासून या खोट्या रेशनकार्डच्या नावाखाली रेशन घेतलं जातं होतं. हे प्रकरण धौलपूर जिल्ह्यातील बाडी उपविभागातील ग्रामपंचायत मरहोलीतील अरुआ गावातील आहे. इथं एक ठाकुरजीचं मंदिर आहे. यात भगवान शालिग्राम, राम, लक्ष्मण, सीता, आणि महादेव आणि मंदिराच्या पुजाऱ्याच्या नावानं रेशनकार्ड बनवले गेले होते.

जेव्हा गावकरी रेशन घेण्यसाठी गेले तेव्हा डिलरनं सांगितलं की, बायोमॅट्रीकवर अंगठा लावा. नंतर म्हटलं की ,अंगठा मॅच होत नाही. त्यामुळं तुम्हाला रेशन मिळणार नाही. यानंतर काही गावकरी ई सेवा केंद्रात गेले. तिथं त्यांनी रेशनकार्डची तपासणी केली. यानंतर त्यांना समजलं की कशा प्रकारे देवाच्या नावानं रेशनकार्ड बनवण्यात आले आहेत. येथून त्यांनी मंदिरातील रेशनकर्डच्या कॉपीज घेतल्या.

यानंतर गावकरी धौलपूरच्या जिल्हा रसद कार्यालयात आले. येथे त्यांनी या प्रकरणाची तक्रार केली. देवाच्या नावानं असणारे रेशनकार्ड पाहून तर अधिकारहीही हैराण झाले. त्यांनती तात्काळ या चौकशीचे आदेश दिले आणि क्षेत्र निरीक्षकांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.