Ration Card | देशातील कोणत्याही ठिकाणाहून तुम्हाला घ्यायचे असेल रेशन, तर करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ration Card | देशातील गरीब कुटुंबांना दिल्ली आणि यूपीकडून मोफत रेशन दिले जात आहे, जे मार्चपर्यंत दिले जाईल. यासोबतच देशातील गरीब कुटुंबांना कमी किमतीत रेशन देण्याची योजना आधीपासूनच आहे. परंतु वितरणाची प्रक्रिया सर्व राज्यांमध्ये वेगळी आहे. अनेक राज्यांमध्ये अन्नधान्यासोबतच इतरही अनेक गोष्टी दिल्या जातात. तेल, हरभरा आणि मीठ मोफत धान्यासोबत दिले जात आहे. (Ration Card)

 

केंद्र सरकार लवकरच ’वन नेशन वन रेशन कार्ड’ (one nation one ration card) ही प्रणाली सुरू करणार आहे. त्यादृष्टीने सरकारकडून तयारी पूर्ण झाली आहे. जर तुम्ही रेशन कार्ड आधारशी लिंक (Linking Ration Card With Aadhaar Card) केले तर तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून रेशन घेऊ शकता आणि तुम्हाला ही सुविधा मिळू शकते. वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत तुम्ही देशातील कोणत्याही ठिकाणी रेशन घेऊ शकता.

रेशन कार्ड सोबत असे लिंक करा आधार

जर तुम्हाला रेशन कार्ड (Ration Card) आधारशी कसे लिंक करायचे हे माहित नसेल, तर येथे एक सोपा पद्धत सांगितली आहे ती फॉलो करा.

प्रथम अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा आणि नंतर Start Now वर क्लिक करा.

येथे तुम्हाला पत्ता, जिल्हा राज्यासह इतर माहिती भरावी लागेल.

यानंतर Ration Card Benefit हा पर्याय निवडा.

आता येथे आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल आणि मोबाईल क्रमांक टाकू शकता.

यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल, तो एंटर करा.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आधार पडताळणी केली जाईल आणि आधार रेशनकार्डशी लिंक केले जाईल.

या प्रक्रियेनंतर तुम्ही देशातील कोणत्याही ठिकाणाहून रेशन घेऊ शकाल.

 

ऑफलाइन आधार असे करा लिंक
UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधार कार्ड शिधापत्रिकेशी लिंक करण्यासाठी आधार कार्डची प्रत, शिधापत्रिकेची प्रत आणि शिधापत्रिकाधारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशनकार्ड केंद्रावर जमा करावे लागेल किंवा रेशन दुकानदाराच्या माध्यमातून जमा करावे लागेल. यानंतर, आधार लिंक करण्यासाठी बायोमेट्रिक घेतले जाईल, त्यानंतर आधार रेशन कार्डशी लिंक केले जाईल.

 

Web Title :- Ration Crad | you want to take ration from any place of country under one nation one card then link aadhar with ration card

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Crime News | तब्बल 70 गाढवांची चोरी; मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची गल्लीबोळात शोधमोहिम

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 225 पेक्षा अधिक नवे रूग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी