अश्लिल मॅसेज पाठवून रेशन दुकानदार महिलेचा विनयभंग, अन्न पुरवठा निरीक्षकांवर FIR दाखल

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – एका महिला रेशन दुकानदाराला मोबाईलवर सातत्याने अश्लिल मॅसेज पाठवून विनयभंग करणाऱ्या कुरखेडा येथील अन्न पुरवठा निरीक्षकाविराेधात कुरखेडा पाेलीस ठाण्यात मंगळवारी (दि.15) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमाकांत वालदे (वय, 46) असे त्या आरोपी अन्न पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाकांत हा मागील काही दिवसांपासून एका महिला रेशन दुकानदाराच्या माेबाईलवर अश्लिल मॅसेज व व्हिडीओ पाठवित हाेता. विधवा असलेल्या त्या महिलेला हा प्रकार असह्य झाल्यानंतर सदर महिलेने रेशन दुकानदार संघटनेला याबाबतची माहिती दिली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या निरीक्षकाला समजावून सांगितले. मात्र त्याने हा प्रकार बंद केला नाही. मंगळवारी वालदे याच्याविराेधात कुरखेडा पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून त्याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरखेडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.