Ration Without Ration Card | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! आता रेशनकार्डशिवाय मिळणार रेशन? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ration Without Ration Card | रेशन कार्ड हे सरकारने दिलेला एक राहण्याचा अधिकृत पुरावा आहे. रेशन कार्ड हे सर्वसामान्य नागरीकांचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकार रेशन कार्डावर गरीबांना स्वस्त किंमतीत धान्य उपलब्ध करुन देत असते. त्याचबरोबर कोरोना महामारीतही सरकारने मोफत रेशन दिले आहे. ती योजना सध्याही सुरू आहे. याचा फायदा शिधापत्रिकाधारकांना होतो. यामुळे सामान्यांना एक दिलासा मिळाला. आता रेशन कार्ड शिवाय रेशन (Ration Without Ration Card) घेऊ शकाल अशा सुविधेवर सरकार काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

रेशनकार्ड शिवाय  रेशन ही सुविधा प्रथम उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि नंतर इतर राज्यांमध्ये सुरू होईल, अशी माहिती आहे. दरम्यान, सरकारने भारतात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ची (‘One Nation, One Ration Card) सुविधा सुरू केलीय. आता या सुविधेत 77 कोटी लोक जोडले गेले आहेत. तुम्ही कुठेही राहात असाल तरी देखील, तुम्हाला केवळ सरकारी दुकानात जाऊन रेशनकार्ड क्रमांक (Ration Card Number) आणि आधार क्रमांक (Aadhaar Number) सांगावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला रेशन मिळेल.

”77 कोटी लोकांपैकी एकूण 96.8 टक्के शिधापत्रिका वापरणाऱ्यांची संख्या आहे, ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशासह 35 राज्यांतील लोकांचा समावेश आहे. सोबतच त्यांनी सांगितले की, कोणीही व्यक्ती इतर कोणत्याही शहरात अथवा राज्यामध्ये नोकरीसाठी गेल्यास रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन रेशन घेऊ शकतो. तसेच त्याला मूळ शिधापत्रिका दाखवण्याची गरज भासणार नाही.” अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी दिली.

Web Title : how to take ration without ration card know in details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त