धुळे : रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रक पकडला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रक शहर पोलीसांनी पकडला आहे. 190 गोण्या रेशनिंगच्या गव्हासह ट्रक पोलीसांनी ताब्यात घेतला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबरी मार्फत रेशनिंगचा गहू काळ्या बाजारत घेऊन जाणाऱ्या ट्रकची माहिती मिळाली. त्यानूसार पोलीसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुली येथून ट्रक (एम.एच. 18 एन 8786) ताब्यात घेतला. जयवंत ठाकरे असे ट्रक चालकाचे नाव आहे.

अन्न व पुरवठा अधिकाऱ्यांनी गव्हाच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.

You might also like