रातोरात बॉलिवूडची ‘डान्सिंग स्टार’ बनली रतलामची ‘गीत कौर’, हृतिक रोशननं शेअर केला व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मध्ये प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील नन्ही बालिका डान्सर गीत कौर बग्गा रातो रात बॉलिवूडची डीन्सिंग स्टार झाली असून सध्या सोशलवर तिचीच चर्चा होताना दिसत आहे. गीत कौर हिचा डान्स व्हिडीओ बॉलिवूड स्टार हृतिक रोशन यानं ट्विटरवरून शेअर केला आहे. यानंतर अनेक सेलेब्सनं हा व्हिडीओ लाईक केला. इतकंच नाही तर फेमस कोरियोग्राफर बॉस्को मार्टीननं गीत कौरला आगामी सिनेमात घेण्याची घोषणाही केली आहे.

रतलामच्या न्यू रोडवरील रहिवासी 6 वर्षीय मुलगी गीत कौर बग्गा हिचा व्हिडीओ हृतिक रोशन यानं शुक्रवारी (दि 12 जून 2020) ट्विटरवरून रिट्विट केला आणि गीत रातोरात बॉलिवूडमध्ये चर्चेत आली. एका दिवसातच व्हिडीओला साडे तीन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले. अजूनही हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गीतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रात गीत झळकताना दिसली. बॉलिवूडमधील फेमस कोरियोग्राफर बॉस्को मार्टीननं हा व्हिडीओ पाहून गीतला त्याच्या सिनेमात घेण्याची घोषणाही केली आहे. बॉस्को व्यतिरीक्त रेमो डिसूजासह इतरही अनेक बड्या कलाकारांनी गीतच्या नृत्याचं कौतुक केलं आहे.

गीतच्या डान्सबद्दल बोलायचं झालं तर रतलामच्या व्योम डान्स स्टुडिओतून गीतनं डान्स ट्रेनिंग घेतली होतं. स्टुडिओच्या संचालकानं अंस सांगितलं की, गेल्या दीड वर्षांपासून गीत डान्सचं प्रिशिक्षण घेत आहे. तिच्या आईवडिलांनी लॉकडाऊनमध्ये सहज तिचा व्हिडीओ काढून तो अपलोड केला होता.