ब्युटी पार्लरमध्ये ‘रेडी’ होण्यासाठी गेली नवरी, मंडपात आला मृतदेह

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रतलाम जिल्ह्यातील जावरा येथे मेकअपसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या वधूची अज्ञात आरोपीने गळा आवळून हत्या केली. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. जावरा सीएसपी पीएस राणावत यांनी सांगितले की, शाजापूरची रहिवासी वधू सोनू वडील कमलसिंग यादव कुटुंबासमवेत सकाळी जावरा येथे आली होती. सोनूचे रविवारी नागदा (उज्जैन) येथील गौरव जैनबरोबर लग्न होणार होते. वधू तयार होण्यासाठी बहिणीसोबत ब्युटी पार्लरमध्ये गेली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात तरुण ब्युटी पार्लरमध्ये आला, त्याने बाहेरून फोन केला, त्यानंतर ब्युटी पार्लरमध्ये घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून तिची हत्या केली. अचानक झालेल्या घडामोडींनी सर्वजण चकित झाले. वधूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेपासून वधू-वर दोघांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.

यापूर्वीही झाले आहे लग्न
सोनू यादवचे काही वर्षांपूर्वी उज्जैन येथे राहणाऱ्या युवकाशी लग्न झाले होते, काही कारणांमुळे हे संबंध तुटले आणि घटस्फोट झाला. आता हे दुसरे लग्न नागदाच्या जैन समाजातील तरुणांशी होणार होते. या प्रकरणाच्या चौकशीत शाजापूर पोलिसही सहभागी झाले होते, याप्रकरणी जावरा पोलिसांकडून माहिती घेण्यात आली आहे.