तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यासह ५० लाखांचे ‘कोकेन’ जप्त

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – कोकेन विक्रीसाठी आलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५० लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले असून अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण तटरक्षक दलाचा अधिकारी तर एक कर्मचारी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

दिनेश शुभसिंह (वय २३, रा. हरियाणा), सुनील कुमार नरेन्द्र कुमार रनवा (वय २६, रा. जिल्हा शिखर राजस्थान), रामचंद्र तुळशीचंद मलीक (वय ५१, रा. सोनवद हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. यापैकी रामचंद्र हा कोस्टगार्डमध्ये वर्ग २ (मास्टर) अधिकारीपदावर, तर सुनील खलाशी म्हणून काम पाहत होता.

अंमली पदार्थाची विक्रीसाठी टोळी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. पथकांनी एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या कार्यालयामागे असलेल्या पकड्या इमारतीमध्ये सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ५० लाख रुपये किंमतीचे ९३६ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –