Ratnagiri Crime | दुर्दैवी! दुचाकीवरून पडून महिला शिक्षिकेचा मृत्यू

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – Ratnagiri Crime | राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असाच एक धक्कादायक अपघात घडला आहे. यामध्ये दुचाकीवरून पडून एका महिला शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कुडोशी गावाजवळ हि दुर्दैवी घटना घडली आहे. (Ratnagiri Crime)

काय आहे नेमके प्रकरण?

सुषमा जयवंत निकम असे या अपघातात मृत पावलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या 54 वर्षांच्या असून त्या भरणे बाईतवाडी, मुळगाव कुळवंडी, तालुका खेड या ठिकाणी राहत होत्या. सुषमा निकम या खेड तालुक्यातील मोहाने या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. घटनेच्या दिवशी त्या सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जात होत्या. त्यावेळी त्यांनी एका दुचाकीला हात दाखवला. यानंतर त्या दुचाकीस्वराच्या पाठीमागे बसून त्या खेडच्या दिशेने येत होत्या. (Ratnagiri Crime)

यादरम्यान कुडोशी गावाजवळ असलेल्या स्पीड ब्रेकर वरून गाडी गेल्यानंतर त्यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. यानंतर रोडवरील बाकी वाहनचालकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने खेडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. सुषमा जयवंत यांच्या निधनाची बातमी समजताच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सुषमा जयवंत निकम यांच्या अपघाती निधनामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे निकम कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Web Title :-Ratnagiri Crime | bike accident at speed breaker female teacher died on the spot in khed ratnagiri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब जिवंत असते तर संजय राऊतांना…,’ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची संतप्त टीका

Amol Mitkari | राज्यपालांचा राजीनामा म्हणजे, उशीरा सुचलेले शहाणपण; अमोल मिटकरींची खोचक टीका