Ratnagiri Flood | रत्नागिरीत धो-धो; पूल गेला वाहून

रत्नागिरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती (Ratnagiri Flood) निर्माण झाली आहे. रत्नागिरीत निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे (Ratnagiri Flood) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) कोकणातील नद्या, ओढे नाले ओसंडून वाहत आले. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीत वस्त्यांमध्ये चक्क 10 ते 15 फूट पाणी असून आता एक जुना पूल वाहून (bridge washed away in flood water) जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

हा जुना पूल कासार कोळवन नदीवरील (Kasar Kolwan river) असून तो वाहून जातानाचे दृश्य मोबाइल कॅमेऱ्यात टिपले गेले आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाहत्या पाण्याचा आणि पुराच्या पाण्याचा जोर किती जबरदस्त आहे याची कल्पना येते.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात (Khed city) पुन्हा पाणी भरले असून पुराचे पाणी खेड-दापोली-मंडणगड महामार्ग (Khed-Dapoli-Mandangad highway) आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

नौदलाच्या तुकड्या तैनात

दरम्यान, स्थानिक नागरिकांची मदत घेऊन एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान बचावकार्याचे काम करीत आहेत.
त्यासोबतच मदत आणि बचावकार्यासाठी रत्नागिरीत आता नौदलाच्या तुकड्याही दाखल झाल्या आहेत.

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 8 मीटर वरून वाहते आहे. वाशिष्ठी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटर वरून वाहते आहे.
काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत.
यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरातील व परिसरातील गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेहण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Web Title : Ratnagiri Flood | heavy rainfall in konkan bridge washed away in flood water at kasarkolvan river ratnagiri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Tight Jeans Pants | धक्कादायक ! ‘टाईट’ जीन्स घालते म्हणून चक्क काका आणि आजोबांनी 17 वर्षीय मुलीशी केलं ‘असं’ काही

Raj Kundra | राज कुंद्राने दीड वर्षात 100 पेक्षा अधिक पॉर्न मुव्हीज तयार करून कमावले कोट्यवधी रुपये

Changes From 1st August | 1 ऑगस्टपासून बदलतील दैनंदिन जीवनाशी संबंधीत ‘हे’ नियम, तुमच्यावर होईल थेट परिणाम, जाणून घ्या