समुद्रातील लाटेपासून वाचण्यासाठी फिरवली बोट, पण…

पोलिसनामा ऑनलाईन – रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी समुद्र किनारी मासेमारी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बोटीला जलसमाधी मिळाली आहे.  गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर बोटीतील जाळीतच एक मृतदेह सापडला असून  दुसर्‍याचा शोध सुरू आहे. ही बोट काल  समुद्रात नेण्यात आली होती. शादत इब्राहिम बोरकर असे ठार झालेल्या मच्छिमाराचे नाव आहे.

भारजा नदीच्या खाडीतून समुद्रात जात असताना मोठी लाट आली. बचावासाठी एकदम वळण घेत असताना बोटीवर लाट आपटून बोट पलटी झाली. यामधील मकबूल शेखअली चाऊस बोट मालक, सलाम युसूफ चाऊस, इम्रान अब्बास अल्बा, इब्राहिम आदम खमसे हे सहाजण बोटीबाहेर फेकले गेले. त्यांच्या सोबत असणार्‍या बोटीवरील लोकांनी ताबडतोब मदत करून वाचवण्यात यश मिळवले. इतर दोन शादत इब्राहिम बोरकर आणि गणी इस्माईल खमसे हे बोटीखाली सापडल्याची दाट शक्यता होती. त्यातील शादत इब्राहिम बोरकर यांचा मृतदेह  बोटीच्याच जाळ्यात सापडला. 6 पैकी दोन जणांची  प्रकृती बिघडल्याने दापोली उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीने काही दिवसांपूर्वी गुहागर समुद्र किनारी बोट बुडाली होती. आता केळशी समुद्र किनारी बुडाली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांवर संकट सुरूच आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी समुद्र किनारी मासेमारी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बोटीला जलसमाधी मिळाली आहे. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर बोटीतील जाळीतच एक मृतदेह सापडला असून दुसर्‍याचा शोध सुरू आहे. ही बोट काल समुद्रात नेण्यात आली होती. शादत इब्राहिम बोरकर असे ठार झालेल्या मच्छिमाराचे नाव आहे.

भारजा नदीच्या खाडीतून समुद्रात जात असताना मोठी लाट आली. बचावासाठी एकदम वळण घेत असताना बोटीवर लाट आपटून बोट पलटी झाली. यामधील मकबूल शेखअली चाऊस बोट मालक, सलाम युसूफ चाऊस, इम्रान अब्बास अल्बा, इब्राहिम आदम खमसे हे सहाजण बोटीबाहेर फेकले गेले. त्यांच्या सोबत असणार्‍या बोटीवरील लोकांनी ताबडतोब मदत करून वाचवण्यात यश मिळवले. इतर दोन शादत इब्राहिम बोरकर आणि गणी इस्माईल खमसे हे बोटीखाली सापडल्याची दाट शक्यता होती. त्यातील शादत इब्राहिम बोरकर यांचा मृतदेह बोटीच्याच जाळ्यात सापडला. 6 पैकी दोन जणांची प्रकृती बिघडल्याने दापोली उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीने काही दिवसांपूर्वी गुहागर समुद्र किनारी बोट बुडाली होती. आता केळशी समुद्र किनारी बुडाली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांवर संकट सुरूच आहे.