दुर्दैवी घटना : विहिरीत गुदमरून एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : पोलिसनामा ऑनलाईन – विहिरीत उतरून साफसफाई करत असताना रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विहिरीत गुदमरून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तिघे जण विहिरींची साफसफाई करण्यासाठी विहिरीत उतरले असताना गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. रविवारी २ जून रोजी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

विजय सागवेकर, नंदकुमार सागवेकर आणि अनिल सागवेकर अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत. मृत तिघेही हे रत्नागिरीमधील निवसर वरचीवाडी येथे एका १८ फूट खोल विहिरीची साफसफाई करण्यासाठी उतरले होते. या कामगारांनी ते साफसफाईचे काम घेतले होते. सकाळी कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी दुपारी जेवण देखील केले. मात्र दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळी त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.