Ratnagiri News | सभेवरून परतल्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्येने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गुहागर तालुक्यातील आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या (Aarey Waki Pimpalvat Gram Panchayat) माजी सदस्या प्राजक्ता देवकर Prajakta Devkar (वय 49 वर्ष) यांनी रामनवमीच्या दिवशी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राजक्ता देवकर या मागच्या काही महिन्यांपासून अल्पशा आजाराने त्रस्त होत्या. तसेच त्या आर्थिक संकटातही होत्या. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्राजक्ता देवकर या रामनवमीच्या दिवशी सकाळी गावातील महिलांच्या सभेला गेल्या होत्या. या सभेवरून परत आल्यानंतर त्यांनी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. यावेळी गावात उत्सव सुरु असल्याने प्राजक्ता यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते (Police Inspector Tushar Pachpute in charge of Guhagar Police Station) त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी भविष्यात अडचणी येवू नयेत म्हणून गावकऱ्यांना विनंती करून प्राजक्ता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे पाठवला.

यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 31 मार्च रोजी शवविच्छेदन करून प्राजक्ता देवकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
देण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर आरेगावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राजक्ता देवकर या सात वर्ष ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. त्यांचा स्वभाव हा मनमिळावू होता.
त्यांच्या या अश्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
प्राजक्ता यांच्या माघारी दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून गुहागर पोलीस (Guhagar Police) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :-  Ratnagiri News | former gram panchayat member prajakta devkar ends life after returning from rally

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MS Dhoni | धोनीचा अजून एक विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला CSK चा पहिला फलंदाज

Maharashtra Govt News | सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद

Ready Reckoner Rate Maharashtra | रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय