MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने तरुणाची आत्महत्या, रत्नागिरी जिल्ह्यातील घटना

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य लोकसेवा आयोगाच्या ( MPSC) च्या परीक्षा वारंवार पुढे ढकलले जात असल्याने आलेल्या नैराश्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ( Suicide) केली आहे. महेश झोरे ( Mahesh Zore) रा. कोर्ले, ता. लांजा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाला MPSC परीक्षा वारंवार पुढे ढकलावी लागत आहे. त्यातच वाढत वय गोष्टीचे नैराश्य महेशच्या मनात होते. त्यामुळे त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याअगोदर महेशने एक सुसाईड नोट लिहिली. सुसाईड नोटमध्ये परीक्षा पुढे ढकलल्या जात आहे म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे त्याने नमूद केले आहे. लांजा पोलीस ठाण्यात त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आई-वडील मुंबईत, अभ्यासाठी एकटाच गावी
महेशच्या घरची परिस्थिती प्रतिकूल असून त्याचे आई आणि वडील कामासाठी मुंबईला असतात. प्रतिकूल परिस्थिती असताना देखील अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगून महेशने गेले अनेक दिवस तो गावीच अभ्यास करत होता. मात्र नैराश्याने मनात इतके घर केले की त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

You might also like