रत्नाकर गुट्टे तर छोटे निरव मोदी, धनंजय मुंडे यांचा गंभीर आरोप

नागपूरः पोलीसनामा आॅनलाईन-

गंगाखेड येथील रत्नाकर गुट्टे यांनी बनावट उद्योग धंद्याची निर्मिती करुन एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 7500 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे  रत्नाकर गुट्टे तर छोटे निरव मोदी आहेत. हा सगळा खेळ कार्पोरेट क्षेत्राचा असून, गुट्टेंना अटक करता नाही आली तरी किमान त्यांचा सल्लातरी घ्या म्हणजे राज्यावरील कर्ज कमी होईल असा खोचक सल्ला धनंजय मुंडे यांनी सभागृहात बोलताना दिला.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d4c1ad0-89b6-11e8-a6fc-db73be26acdd’]

अनेकदा शेतकऱ्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या बाबातीत आवज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकरण दाबण्यासाठी रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांना धमक्या देऊन मारहाण केली. कर्ज घेण्याच्या प्रकरणातील सर्वात मोठा घोळ असून रिजर्व्ह बॅंकेची कोणतीही परवानगी न घेता कर्ज घेतली आहेत. एवढेच नाहीतर गंगाखेड सोलार नावाची कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही. शेतकऱ्यांच्या नावाने 5 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज घेतली आहेत.

यावेळी धनंजय मुंडे यांनी डीएसके प्रकरणाचा दाखला देत, डीएसकेवर कारवाई होते मग गुट्टेवर का नाही असा सवाल उपस्थित केला. का रत्नाकर गुट्टेंसाठी वेगळा कायदा आहे. का रत्नाकर गुट्टेंची मदत सत्ता पक्षाला आहे. एवढा गंभीर प्रकार असताना देखील सरकार शांत आहे. सरकारने जर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर हा व्यक्ती एक दिवस देश सोडून जाईल असेही मुंडे यांनी म्हटले आहे. याप्रकरणातील सर्व पुरावे मी सरकारला दाखवण्यास तयार आहे. हा एक दोन नाहीतर 27 हजार शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. गेल्या वर्षभरात आदेश देऊन देखील गुट्टेंना अटक करण्यात आलेली नाही. एसआयटी ची नेमणूक करण्यात आली मात्र कारवाई काहीच नाही. त्यामुळे गुट्टेंच्या पाठीमागे सरकार असून ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’24d17522-89b6-11e8-b870-f77b8a145388′]

पहा नेमके कोण आहेत रत्नाकर गुट्टेः 

बीडच्या परळी तालुक्याती दैठनघाट गावचे रहिवाशी आहेत ते, परळीच्या थर्मल प्लॅंटवर एक मजूर ते कंत्राटदार, सुनिल हायटेक प्राव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून देशभरातून विज प्रकल्पाची कंत्राटं मिळवली. शरद पवारांच्या हस्ते गंगाखेड शुगर कारखान्याचा शुभारंभ केला. सध्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ते अोळखले जातात. रासपच्या तिकीटावर 2014 ची विधान परिषदेची निवडणूक त्यांनी लढवली आहे. असा त्यांचा प्रवास आहे.