TV मध्ये ‘रामायण’मधील ‘सीता-हरण’ पाहून भावूक झाले ‘रावण’ अरविंद त्रिवेदी ! जोडले हात (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेतील रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी हे सीता हरणचा एपिसोड पहात आहेत. यावेळी ते भावूक होऊन हात जोडत आहेत.

https://www.instagram.com/tv/B-4oP5dAbRQ/?utm_source=ig_embed

रामायण ही मालिका 1987-88 मध्ये आली होती. आता अरविंद त्रिवेदी यांचं वय 80 पेक्षा जास्त आहे. व्हिडीओत दिसतंय की, डीडीवर रामायणमधील सीता हरणचा एपिसोड सुरू आहेत. परंतु अरविंद अचानक भावूक होतात आणि हात जोडतात. त्यांनी साकारलेला रावण आजही लोकांच्या लक्षात आहे. रावणाचा अहंकार, त्यांचं हासणं त्यांनी खूप उत्तमरित्या साकारलं आहे.

सध्या अरविंद यांचा हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ ट्विटर तसेच इंस्टावरूनही शेअर केला आहे.

रामायण या डीडीवरील मालिकेत अरविंद त्रिवेदी यांनी रावण, सुनील लहरी यांनी लक्ष्मण, दारा सिंह यांनी हनुमान, अरुण गोविल यांनी राम आणि दीपिका चिखलियानं सीतेची भूमिका साकारली होती. सध्या रिपीट टेलीकास्ट झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांतील सारे टीआरपी रेकॉर्ड या मालिकेनं तोडले आहे. आजही हा शो लोकप्रिय होताना दिसत आहे.