रावण गॅंगचा मुख्य ‘ससा’ पिस्तुलासह अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – रावण गॅंगचा मुख्य सूत्रधारास पोलिस आयुक्तांनी स्थापण केलेल्या विशेष पथकाने आकुर्डी येथून पिस्तुल आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे. विशेष म्हणजे तडीपार असताना खुलेआम कंबरेला पिस्तुल लावून फिरताना आढळून आला आहे.

रावण गॅंगचा म्होरक्या अनिकेत जाधव याच्या खुना नंतर या गॅंगची सुत्रे ससा उर्फ सागर उर्फ दशरथ वाघमोड़े यांनी घेतली आहेत. ससा म्हणून ओळख असणाऱ्या वाघमारे याच्यावर देहूरोड, पिंपरी, चिंचवड़, आणि पुणे शहर पोलिस ठाण्यात या पूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातून त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तड़ीपार असताना देखील तो शहरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

विशेष पथकातील पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अंगझड़ती घेतली असत त्याच्याकड़े एक देशी बनावटी ची पिस्टल आणि 2 राउंड सापडले. निगडी पोलिस तपास करत आहेत.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

Loading...
You might also like