मोक्का आणि खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आणि रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगारास दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. मंगेश नामदेव पालवे (२८, रा. मोरेवाडी, ता. मुळशी) आणि करन रतन रोकडे (२१, रा. रोकडे वस्ती, चिखली) या दोघाना अटक केलेली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7b470687-ca1b-11e8-9c32-f7447b0e99e0′]
वाकडचे वरीष्ठ निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्यातील टीम क्रमांक तीन आणि १७ हे भूमकर चौकात शनिवारी (दि. 6) कारवाई करत होते. त्यावेळी मंगेश पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो पौड पोलीस ठाण्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे उघड झाले.
तसेच आज (रविवारी) दुपारी दीडच्या सुमारास कस्पटे चौक येथे टीम क्रमांक १० आणि १७ कार्यरत होते. त्यावेळी देहूरोड पोलीस ठाण्यातील मोक्का कारवाई झालेला आणि फरार असलेल्या आरोपी एका चहाच्या टपरीवर थांबल्याचे आढळले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता तो देहूरोड पोलीस ठाण्यातील मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
[amazon_link asins=’B07CRMPS35,B07FLY4D14′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’927c08a5-ca1b-11e8-9aa2-8bc30e806e1b’]
पोलीस आयुक्त पद्मानाभन यांनी काही दिवसांपूर्वी बिट मार्शल पध्द्त बंद करुन टीम पथक सुरू केली. चौका चौकात पोलीस उभे केले. त्यामुळे काही वेळातच पोलिसांचा प्रतिसाद मिळत आहे. याच टीम पथकाने वाकड पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगार जेरबंद केले आहेत.