रावण गँगचा पर्दाफाश ; ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

शहापूर पोलिसांनी धडक कारवाई करत परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या रावण गँगच्या मुसक्या आवळल्या. यावेळी २८ मोबाईल, ३ मोटारसायकली, २२ सिमेंट पत्र्याची पानं असा एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7555fc36-9f1c-11e8-b5f7-6b62a80cf7af’]

परिसरामध्ये वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहापुर पोलीस ठाण्याचे पथक रात्रीची गस्त घालत असताना नंबर प्लेट नसलेल्या दोन मोटार सायकलवरून जाणाऱ्या सुरज मेहबुब चिक्कोडे आणि विनायक आनंदा जांभळे यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. संशय आल्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता, त्यांनी स्वप्नील बाबुराव वराळे, मयुर दिपक कांबळे, सौरभ अशोक मस्के, विनायक संभाजी चौगुले, ( रा. तारदाळ, ता. हातकणंगले ) यांनी परिसरातील अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागरिकांकडून जबरदस्तीने मोबाईल फोन काढून घेतले असून, शहापूर , हातकणंगले, शिवाजीनगर या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोटार सायकली देखील चोरल्या असल्याची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून सर्वांना ताब्यात घेवून विचारणा केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले.
दरम्यान ज्यांचे मोबाईल फोन चोरी झाले आहेत त्यांनी शहापूर पोलीस ठाण्याकडून जयसिंगपूर, वडगाव, हातकणंगले, शिवाजीनगर , इचलकरंजी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7aa9a994-9f1c-11e8-bbc4-67d406544876′]

सदरची कारवाई पोलीस आधीक्षक अभिनव देशमुख, इलकरंजी विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, इचलकरंजीचे उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय हारूगडे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी गुरव, कमलेश रजपूत, सुरेश कोरवी, पोलीस हवालदार शब्बीर बोजगर, इम्तिहाज कोठीवाले, अमर कदम, अमर पाटील, गजानन बागाले, सुनिल बईत, आबासाहेब चौधर यांच्या पथकाने केली.