पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे आजही सर्वांच्या लक्षात आहे आणि या गाण्यातील अभिनेत्री रवीना टंडनला (Raveena Tandon) तर लोक कधीच विसरू शकणार नाहीत. रवीनाने 1990 च्या दशकात एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. त्यावेळी रवीनाची अदा पाहून चाहते कायमच घायाळ व्हायचे. रवीनाने ‘पत्थर के फूल’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर रवीना (Raveena Tandon) तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात घर करून राहिली. आजवर रवीनाने परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. रवीना पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने शेअर केलेले तिचे काही नवीन फोटोज. यामधील ट्रेडिशनल लूकमध्ये रवीना खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
रवीनाचे लूक चाहत्यांना नेहमीच आकर्षित करत असतात. रवीनाची कर्वी फिगर सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. रवीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तिने लेहंगा परिधान केला असून हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे. केस मोकळे सोडत न्यूड लिपस्टिक आणि चमकदार मेकअप करत तिने आपल्या लूक पूर्ण केला आहे. रवीनाचे हे ट्रेडिशनल लूक देखील चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत तिचे वय जरी वाढत असले तरी सौंदर्यात कोणतीच कमी दिसत नसल्याचे म्हटले आहे.
रवीना (Raveena Tandon) काही दिवसांपूर्वी ‘KGF 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. रवीनाला 2001 साली आलेला ‘दमन’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. तर अभिनेत्री रवीनाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. रवीनाचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. इंस्टाग्रामवर रवीनाचे7.4 मिलियन फॉलोवर्स देखील आहेत. तर रवीनाने नुकताच शेअर केलेल्या ट्रेडिशनल लूक मधील फोटोवर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.
Web Title :- Raveena Tandon | bollywood raveena tandon shared new look in traditional outfits take a look
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Community Health Officer | मोठी बातमी! राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन
Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ