Video : वर्क फ्रॉम होममध्ये कशी घ्याल डोळ्यांची काळजी ? रवीना टंडननं शेअर केला व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रवीना टंडन तिच्या काही फोटोमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. सोशलवर ती कायमच सक्रिय असते. अशात रवीना एका व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे. ज्यात ती डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि डार्क सर्कल कसे घालवायचे यासाठी घरगुती उपाय सांगत आहे.

रवीनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणते, “लॉकडाऊनमुळं आपण सारे घरातच आहोत. यामुळं मुलांचा लॅपटॉप किंवा स्क्रीन टाईम वाढला आहे. वर्क फ्रॉम होम वाल्यांनाही जास्त वेळ स्क्रीनसमोर बसावं लागतं. यासाठी डोळ्यांना आराम मिळवा म्हणून आणि डार्क सर्कलसाठी आपण काही उपाय जाणून घेणार आहोत.”

डार्क सर्कलपासून मिळेल सुटका

रवीना पुढीलप्रमाणे प्रक्रिया करण्यास सांगत आहे. ती म्हणते-

एका कटोरीत थंड दूध घ्या
यात दोन कापसाचे बोळे भिजवा
आता यांना पिळून हे थंड गोळे आपल्या डोळ्यांवर ठेवा
हा उपाय रोज आणि नियमित करा.

रवीना म्हणते की, हा उपाय केल्यास डोळ्यांचा थकवा कुठल्या कुठे पळून जाईल हे समजणारदेखील नाही. याशिवाय यामुळं डोळे रिलॅक्स होतील, मॉईश्चराईज होतील आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळही जातील असं ती कॅप्शनमध्ये म्हणाली आहे.