Raveena Tandon | रवीना टंडनने ‘या’ व्यक्तवयीबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली तो मला…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Raveena Tandon | अनेक वर्षापासून मनोरंजन सृष्टीवर काम करत चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रविना टंडन (Raveena Tandon). रविना टंडन ची फॅनफॉलोवर्स (Fans) आज देखील तिच्यावर तितकेच प्रेम करतात. एका मुलाखतीत रविना टंडन ने तिच्या फॉलोवर्समुळे झालेल्या त्रासाबद्दल (Bad Experience) काही किस्से सांगितले आहे.

 

एका मुलाखतीत रविना टंडनला सांगितले की फॅन्समुळे कशा पद्धतीने तिला मनस्ताप झाला होता. “रविना टंडनचा एक फॅन इतका वेडा होता की तो रवीनाला स्वतःची पत्नी मानत होता आणि तिच्या मुलांना स्वतःची मुले म्हणत होता. एवढेच नाही तर तो मला त्याच्या रक्ताने माखलेल्या काचेचे तुकडे कुरियर करत असे आणि स्वतःच्या रक्ताने लिहिलेली पत्रे तर कधी अश्लील फोटोही पाठवत असे”.

 

यापुढे बोलताना रवीना (Raveena Tandon) म्हणाली, “एकदा माझ्या पतीच्या गाडीवर मोठा दगड कुणीतरी फेकला होता.
यानंतर आम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली होती. तर एक फॅन असा होता की जो रोज आमच्या घराच्या गेटवर बसायचा.
या अशा सगळ्या प्रकारामुळे मी हैराण झाले होते आणि लोकांच्या या वेडेपणाची मला भीती वाटू लागली”.
रवीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ‘केजीएफ -2’ (KGF- 2) या पिक्चर मध्ये रवीनाला शेवटचे पाहण्यात आले होते.
या चित्रपटात तिची भूमिका चाहत्यांना खूपच आवडली होती. सध्या रवीना OTT वरती छाप टाकण्यासाठी सज्ज झाली असून एका नवीन वेब सिरीज च्या कामात ती व्यस्त आहे.

 

Web Title :- Raveena Tandon | raveena tandon shared bad experience of her fans

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचे टोचले कान, नेत्यांना दिले ‘हे’ आदेश

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये पाऊस पडला ‘या’ प्रकारे जाहीर करण्यात येणार विजेता, आयसीसीचे नवीन नियम

Pune PMC News | पुणे मनपामध्ये करणार आणखी 200 हून अधिक पदांची भरती; आरोग्य आणि अग्निशामक दलामधील भरतीस प्राधान्य