मनोरंजन

Coronavirus : ‘कोरोना’मुळं टॉयलेट पेपरचा तुटवडा ! अभिनेत्री रवीना टंडन म्हणाली – ‘लोटा जिंदाबाद’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसवरून बॉलिवूड स्टार आपापल्या पद्धतीनं रिअ‍ॅक्शन देत आहेत. अभिनेत्री रवीना टंडन हिनं अलीकडेच कोरोनावरून ट्विट केलं आहे. कोरोना व्हायरसमुळं टॉयलेट पेपरच्या झालेल्या तुटवड्यावर तिनं भाष्य केलं आहे. टॉयलेट पेपरवर झालेल्या कमतरतेवर बोलताना तिनं लोटा जिंदाबाद असं म्हटलं आहे. कोरोनामुळं टॉयलेट पेपरचा तुटवडा झाला आहे ज्यामुळं बिडेट विक्रीनं आसमान गाठलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये रवीना टंडन म्हणते, “स्वच्छतेच्या बाबतीत एक धडा. टिश्यू रोलवर आता कमी दबाव राहिल. वक्षतोडही कमी होईल. मूळ गोष्टी पुन्हा येत आहेत.” सध्या रवीनाचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे.

रवीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती डान्स रिअ‍ॅलिटी शो नच बलिए सीजन 9 होस्ट करताना दिसली होती. सध्या ती सिनेमांपासून दूर असल्याचं दिसत आहे. ती केवळ स्पेशल अपीयरंस म्हणून सिनेमात सहभागी होताना दिसते. असं म्हटलं जात आहे की, साऊथ सुपरस्टार यश याचा बहुप्रतिक्षित सिनेमा KGF चॅप्टर 2 मध्ये दिसणार आहे. या सिनेमातून रवीना सिनेमात कमबॅक करणार आहे.

 

Back to top button