रवीना टंडनच्या बिकिनी अवताराचा सोशल मीडियावर ‘राडा’ ! समुद्रकिनारी दिल्या ‘पोज’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार रवीना टंडन तिच्या काही फोटोमुळं चर्चेत आली आहे. एख जुना फोटो शेअर करत तिनं आठवणींना उजाळा दिला आहे. रवीनालाही कुठे तरी फिरायला जावंसं वाटत आहे. परंतु लॉकडाऊनमळं ते शक्य नाही. अशात तिनं काही जुने फोटो शेअर केले आहेत जे सोशलवर चर्चेत आले आहेत.

रवीनानं अलीकडेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत या तिनं बिकिनी घातली आहे. डोळ्यावर गॉगल लावलेली रवीना खूपच हॉट दिसत आहे.

रवीना टंडनसोबत तिचा पतीही या फोटोत दिसत आहे. अनिल ठडानी असं तिच्या पतीचं नाव आहे. फोटोत दोघंही खूप खुश दिसत आहेत.

या फोटोची आणखी एक खास बात अशी की, तिच्या बॉडीवर विंचवाचा टॅटूही दिसत आहे. तिनं खूप शानदार पद्धतीनं टॅटू फ्लाँट केला आहे.

रवीनानं फोटो शेअर करत असंही म्हटलं आहे की, लॉकडाऊन लवकरच संपण्याची वाट पहात आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

रवीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती डान्स रिअॅलिटी शो नच बलिए सीजन 9 होस्ट करताना दिसली होती. सध्या ती सिनेमांपासून दूर असल्याचं दिसत आहे. ती केवळ स्पेशल अपीयरंस म्हणून सिनेमात सहभागी होताना दिसते. असं म्हटलं जात आहे की, साऊथ सुपरस्टार यश याचा बहुप्रतिक्षित सिनेमा KGF चॅप्टर 2 मध्ये ती दिसणार आहे. या सिनेमातून रवीना अॅक्टींगमध्ये कमबॅक करणार आहे.